TRENDING:

उन्हाचे चटके अन् धो धो पाऊस, मराठवाड्यात परतीच्या पावसाचा जोर, IMD चा अलर्ट

Last Updated:
राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/5
उन्हाचे चटके अन् धो धो पाऊस, मराठवाड्यात परतीच्या पावसाचा जोर, IMD चा अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हिटमुळे मराठवाड्यात उष्णतेचा पारा चांगलाच चढला आहे. अशातच राज्यात पुन्हा एकदा परतीचा मान्सून सक्रीय झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यातील बहुंताश भागांत पावसाच्या सरी कोसळतील. छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर या ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
3/5
गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील तापमानाचा पाराही चढला आहे. त्यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतोय. छ. संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 33 अंशांवर गेलंय. आज 29 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
गेल्या काही दिवसांत छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं चित्र होतं. पण आता या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
5/5
पुढील काही दिवस परतीच्या पावसाचा जोर कायम राहणार आहे. वातावरणातील बदलांमुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या काढणीला आलेल्या पिकांची योग्य ते नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
उन्हाचे चटके अन् धो धो पाऊस, मराठवाड्यात परतीच्या पावसाचा जोर, IMD चा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल