मराठवाड्यात पुन्हा जोरधार, 3 दिवस पावसाचे, हवामान विभागाचा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
मराठवाड्यात परतीचा पाऊस पुन्हा धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. आज काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
1/5

राज्यात परतीच्या पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही जोरदार पाऊस होतोय. आज पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढील 3 दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत गुरुवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. आज पुन्हा काही ठिकाणी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली येथे पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्ता आहे. तर नांदेड आणि लातूर येथे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासहित तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
advertisement
4/5
मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात सध्या ऑक्टोबर हिटचे चटके आणि परतीच्या पाऊस अशी विचित्र हवामान स्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरमधील उष्णतेचा पारा 32 अंशांवर गेला आहे.
advertisement
5/5
छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं चित्र होतं. पण आता पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यात पुन्हा जोरधार, 3 दिवस पावसाचे, हवामान विभागाचा अलर्ट