Gadchiroli News : रानटी हत्ती थेट अंगावर चालून आला; गडचिरोलीतील भयानक घटनेत वनकर्मचाऱ्याचा मृत्यू, PHOTO
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तीच्या हल्ल्यात वनविभागाच्या एका कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. (महेश तिवारी, प्रतिनिधी)
advertisement
1/5

गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तीचा धुमाकूळ सुरू असून हत्तीने चिरडल्याने वनविभागाच्या एका कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
advertisement
2/5
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. अलीकडेच आरमोरी वनपरिक्षेत्रामध्ये पळसगावच्या वनक्षेत्रात रानटी हत्तींचा मुक्काम सुरु असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पीकही रानटी हत्तींनी केलेल्या हैदोसामुळे पीक नष्ट झाले आहे.
advertisement
3/5
पळसगाव वन कक्षात रानटी हत्ती आल्याची माहीती गावकऱ्यांनी वनविभागाला कळवली होती. त्यानुसार वन कर्मचारी आणि स्थानिक नागरिक रानटी हत्तींना पळवुन लावण्याचा प्रयत्न करीत होते.
advertisement
4/5
बिथरलेले हत्ती सैरावैरा धावत होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक आणि वन कर्मचारी हत्तींना पिटाळून लावत असताना वाहन चालक असलेले वनविभागाचे कर्मचारी सुधाकर आत्राम गाडीच्या बाजूला उभे होते.
advertisement
5/5
जंगलातून त्यांच्या दिशेने रानटी हत्ती अचानक समोर आला तोपर्यंत नागरिक पळुन गेले. मात्र, त्या ठिकाणी असलेल्या वाहन चालक सुधाकर आत्राम खाली पडले. त्यानंतर हत्तींनी वाहन चालकाला जमिनीवर चिरडून ठार केले. नागरिकांनी कर्मचाऱ्यांच्या आरडाओरड झाल्यानंतर रानटी हत्ती जंगलाच्या दिशेने निघून गेले. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/गडचिरोली/
Gadchiroli News : रानटी हत्ती थेट अंगावर चालून आला; गडचिरोलीतील भयानक घटनेत वनकर्मचाऱ्याचा मृत्यू, PHOTO