TRENDING:

आधी दारू पाजली, मग बेसावध क्षणी कोयत्याचे वार, गळा चिरला, अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या

Last Updated:
Gondia Youth Murder: नरेशची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे आमगाव पोलिसांनी सांगितले.
advertisement
1/5
आधी दारू पाजली, मग बेसावध क्षणी कोयत्याचे वार, गळा चिरला, अनैतिक संबंधातून हत्या
गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सावंगी-पदमपुर शेतशिवरात आज सकाळच्या सुमारास अर्धवट गळा कापलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळलेला होता. याप्रकरणी आमगाव पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
advertisement
2/5
नरेश चौधरी असे मृत तरुणाचे नाव आहे तर श्रवण सोनवणे (25) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नरेशची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे सांगत अधिक तपशील देण्यास पोलिसांनी नकार दिला.
advertisement
3/5
मृतक नरेश चौधरी आणि आरोपी श्रवण सोनवणे हे दोघेही एकाच गावातील रहिवासी असून काल रात्रीच्या सुमारास दोघेही आमगावला गेले. तिथून दोघांनीही दारू घेऊन पदमपूर शेतशिवारामध्ये जेवण करण्याचा बेत आखला. दोघांनी मद्यप्राशन केले, त्यानंतर आरोपी श्रवण याने नरेश बेसावध असताना मागून त्याच्या गळ्यावर धारधार कोयत्याने वार केले. यातच नरेश याचा मृत्यू झाला.
advertisement
4/5
आज सकाळी नरेशचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित आरोपी श्रवण सोनवणे याला अटक केली आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement
5/5
घटनेचा पुढील तपास आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे व पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
आधी दारू पाजली, मग बेसावध क्षणी कोयत्याचे वार, गळा चिरला, अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल