Photo: सख्ख्या मावस भावासोबत अनैतिक संबंध, त्याच्याच मदतीने नवऱ्याचा खून? जळगावातील थरारक घटना
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Jalgaon youth Murder: आकाशची पत्नी पूजाच्या प्रियकर असलेल्या मावसभावनेच आकाश याचा खून केला असा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
advertisement
1/5

जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरात एका हॉटेलजवळ तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. आकाश पंडित भावसार असे हत्या झालेल्या 30 वर्षीय मयत तरुणाचे नाव असून आकाशच्या पत्नीच्या नातेवाईकांनी खून केल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
2/5
मयत आकाशची पत्नी पूजाचे तिच्या सख्ख्या मावस भावासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून खून हा झाल्याचा आरोप मयत तरुणाच्या आई, बहीण तसेच मेव्हणे यांनी बोलताना केला आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पावित्रा मयत आकाश यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.
advertisement
3/5
आकाशच्या पत्नी पूजाच्या प्रियकर असलेल्या मावसभावनेच आकाश याचा खून केला आरोप कुटुंबियांनी केला असून काल घटनेच्या दिवशी सकाळी मारेकरी हे मयत आकाश यांच्या मूळ गावी त्याला मारण्यासाठी गेले होते. मात्र तो जळगावला असल्याची माहिती मिळाली. घटनेच्या दिवशी आकाश याचा शोध घेणाऱ्या मारेकऱ्यांना आकाशबद्दलची माहिती त्याची पत्नी पूजा हिनेच दिल्याचे देखील मयत आकाश याच्या कुटुंबीयांनी सांगितले.
advertisement
4/5
दरम्यान, याप्रकरणी पाच जणांविरोधात शनीपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे. शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आकाश पंडित भावसार (वय 27) या तरुणाचा खून करण्यात आलेला आहे.
advertisement
5/5
मयताच्या आईने पोलीस स्टेशनला आरोपीविरोधात फिर्याद दिलेली आहे. मयताच्या पत्नीचे अजय मोरे नामक व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध असल्याचे मयताच्या आईने फिर्यादीत सांगितले. त्या अनैतिक संबंधातून अजय मोरे, चेतन सोनार व इतर तिघांनी मिळून आकाश भावसार या तरुणाचा खून केल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Photo: सख्ख्या मावस भावासोबत अनैतिक संबंध, त्याच्याच मदतीने नवऱ्याचा खून? जळगावातील थरारक घटना