Express Highway Accident : एक्सप्रेस वेवर एर्टिगाचा भयानक अपघात, डोंबिवलीतील तिघं जागीच ठार, घटनास्थळाचे PHOTOS
- Published by:Shreyas
Last Updated:
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातात डोंबिवलीतल्या बर्वे कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू झाला आहे.
advertisement
1/6

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये डोंबिवलीतल्या एकाच कुटुंबातल्या तिघांना जीव गमवावा लागला आहे.
advertisement
2/6
डोंबिवलीतलं बर्वे कुटुंब देव दर्शन आटपून येत असताना हा भयावह अपघात झाला आहे. या अपघातात बर्वे कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.
advertisement
3/6
नियंत्रण सुटल्यामुळे एर्टिगा मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेच्या डिव्हायडरवरून थेट रस्त्याच्या खालीच गेली, यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
advertisement
4/6
या गाडीचा वेग इतका जास्त होता की एक्सप्रेस हायवेवर लावलेल्या रेलिंग तोडून गाडी रस्त्याच्या खाली गेली.
advertisement
5/6
मृत्यू झालेल्यांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. गाडीमध्ये लहान मुलांसह एकूण 12 जण असल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
6/6
जखमी झालेल्या 9 जणांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, यातले काही जण गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Express Highway Accident : एक्सप्रेस वेवर एर्टिगाचा भयानक अपघात, डोंबिवलीतील तिघं जागीच ठार, घटनास्थळाचे PHOTOS