Vidarbha Rain Alert : आता सुट्टी नाही! विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आज 17 मे रोजी सुद्धा विदर्भात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आला आहे.
advertisement
1/7

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे वातावरण कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात पुढील काही दिवस अशीच स्थिती राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. गेले कित्येक दिवस सतत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे.
advertisement
2/7
आज 17 मे रोजी सुद्धा विदर्भात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आला आहे.
advertisement
3/7
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे तापमानात चढ-उतार जाणवत आहे.
advertisement
4/7
काही जिल्ह्यांत किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या घरात असून कमाल तापमान 42 अंशांपर्यंत पोहोचले आहे. पाऊस आणि उकाडा यामुळे वातावरणांत दमटपणा निर्माण होत चाललाय. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
advertisement
5/7
हवामान विभागाने अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. या सर्वच ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
6/7
या तिन्ही जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढत आहे. फळबाग, भाजीपाला आणि इतरही काही पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी कासावीस झाले आहे. शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घ्यावी. त्याचबरोबर योग्य नियोजन करून शेतीची कामे करावीत, अशा सूचना कृषी विभागाकडून देण्यात येत आहेत.
advertisement
7/7
सध्याच्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर जाणे टाळावे. तसेच इतरही आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Vidarbha Rain Alert : आता सुट्टी नाही! विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट