TRENDING:

Vidarbha Weather: छत्री घ्यायची की टोपी? विदर्भात पुन्हा दुहेरी संकट, आज 2 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Vidarbha Weather: विदर्भातवर गेल्या काही काळापासून अवकाळी संकट घोंघावत आहे. आज 2 जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/7
आज छत्री घ्यायची की टोपी? विदर्भात पुन्हा दुहेरी संकट, 2 जिल्ह्यांना अलर्ट
एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच राज्यातील वातावरणात विचित्र बदल घडून आलेत. तापमानात वाढ झाली त्याचबरोबर विविध ठिकाणी अवकाळी पाऊस झालाय. त्यामुळे वातावरणांत दमटपणा निर्माण झाला. विदर्भात गेले काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. आज 18 एप्रिलला पुन्हा दोन जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
2/7
विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमान 40 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत असल्याचं दिसून येतं आहे. नागपूरमध्ये आज 18 एप्रिलला अंशतः ढगाळ वातावरण असणार आहे. मात्र, पावसाची शक्यता नाही. तेथील कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
अमरावतीमधील कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी सुद्धा अंशतः ढगाळ वातावरण असू शकतं. मात्र, कुठलीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.
advertisement
4/7
अकोल्यातील कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस इतके राहील. त्याठिकाणी आज अंशतः ढगाळ वातावरण असू शकतं. विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद ही अकोल्यात झालेली दिसून येत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
advertisement
5/7
वर्धा जिल्ह्यातील कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके राहील. त्याठिकाणी आज अंशतः ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीये. गोंदिया जिल्ह्यातील कमाल तापमान 40 अंश तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
6/7
बुलढाणा जिल्ह्यातील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. याठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असू शकतं. चंद्रपूर आणि यवतमाळ मधील कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. दोन्ही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील. यवतमाळमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
7/7
विदर्भात तापमानात वाढ आणि ढगाळ वातावरण असल्याने वातावरणात दमटपणा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. बाहेर पडताना पाण्याची बॉटल आणि इतर आवश्यक वस्तू सोबत घेऊन बाहेर पडणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Vidarbha Weather: छत्री घ्यायची की टोपी? विदर्भात पुन्हा दुहेरी संकट, आज 2 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल