विदर्भ गारठला, 3 जिल्ह्यासाठी IMD कडून अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Weather Forecast: राज्यात थंडीचा जोर वाढत असून विदर्भात देकील किमान तापमानात घट होताना दिसून येत आहे. सोमवारी विदर्भात स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे वातावरण बघायला मिळाले. आज 5 नोव्हेंबरला राज्यातील हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/5

विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज कोरडे हवामान राहणार आहे. नागपूरमध्ये धुक्यासह ढगाळ आकाश राहून हवामान कोरडे असणार आहे. नागपूरमधील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. तर अमरावतीमध्ये धुक्यासह ढगाळ आकाश राहून वातावरण कोरडे असणार आहे. तर कमाल तापमान 34 आणि किमान 20 अंश सेल्सिअस असणार आहे.
advertisement
2/5
चंद्रपूरमध्ये धुक्यासह ढगाळ आकाश राहून वातावरण कोरडे असणार आहे. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. चंद्रपूरमधील किमान तापमानात घट होत असल्याने तेथील नागरिकांना गुलाबी थंडी जाणवायला सुरवात होणार आहे. वर्धामध्ये देखील धुक्यासह ढगाळ आकाश राहून वातावरण कोरडे असणार आहे.
advertisement
3/5
गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असेल. किमान तापमानात घट नोंदवल्याने त्याठिकाणी थंडीचा जोर वाढणार आहे. अकोलामध्ये सुद्धा धुक्यासह ढगाळ आकाश राहून वातावरण कोरडे असणार आहे. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
4/5
बुलढाणाण्यात देखील धुक्यासह ढगाळ आकाश राहील. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान 19 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. वाशिममध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश राहून वातावरण कोरडे असणार आहे. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. तर यवतमाळ मध्ये आज स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असेल.
advertisement
5/5
गडचिरोलीमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहून वातावरण कोरडे असणार आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. भंडारा मध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे. चंद्रपूर, गोंदिया, बुलढाणा या जिल्ह्यांत गुलाबी थंडीचा जोर वाढतांना दिसून येत आहे. इतर जिल्ह्यांत फारशी थंडी जाणवणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
विदर्भ गारठला, 3 जिल्ह्यासाठी IMD कडून अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?