TRENDING:

पुण्यात साकारलंय डोळ्याचं पारणं फेडणारं पद्मनाभ मंदिर, दगडूशेठची सजावट बघाल तर हरखून जाल..

Last Updated:
Dagdusheth Ganpati Pune: केरळमध्ये असणाऱ्या भगवान विष्णूच्या पद्मनाभ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती पुण्यात साकारण्यात आली आहे.
advertisement
1/5
पुण्यात साकारलंय डोळ्याचं पारणं फेडणारं पद्मनाभ मंदिर, दगडूशेठची सजावट बघाच
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरांकडून गणेशोत्सवात दरवर्षी भव्य अशा ऐतिहासिक मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येते.
advertisement
2/5
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडून गेल्या अनेक वर्षांपासून देशाच्या ऐतिहासिक आणि मोठ्या मंदिराची प्रतिकृती गणेशोत्सवात साकारली जाते आणि याच मंदिरात भक्तांचा लाडका बाप्पा विराजमान होतो.
advertisement
3/5
यंदाच्या वर्षी देखील तीच परंपरा जपत केरळच्या पद्मनाभ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडून करण्यात आली आहे.
advertisement
4/5
बाप्पा यंदा ज्या मंदिरात विराजमान होतील ते मंदिर 111 फूट उंचीचे असून सुरेख रेखीव आणि डोळ्याचं पारणं फेडणार नक्षीकाम या मंदिराला करण्यात आले आहे.
advertisement
5/5
केरळमध्ये असणाऱ्या भगवान विष्णूच्या पद्मनाभ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. आकर्षक मंदिराचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून या मंदिराला आकर्षक अशी रोषणाई देखील करण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
पुण्यात साकारलंय डोळ्याचं पारणं फेडणारं पद्मनाभ मंदिर, दगडूशेठची सजावट बघाल तर हरखून जाल..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल