TRENDING:

राज्यात पहिल्यांदाच असं घडलं, हिंगणघाटाची बातमी वाचून कराल कौतुक

Last Updated:
दुहेरी उद्देशाने आणि अतिशय सुंदरपणे बांधलेल्या या टॉयलेटचे सर्वत्र कौतूक होत आहे.
advertisement
1/6
राज्यात पहिल्यांदाच असं घडलं, हिंगणघाटाची बातमी वाचून कराल कौतुक
नाविन्यपूर्ण योजनेतून <a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">वर्ध्यातील</a> हिंगणघाट नगरपरिषदेने राज्यात पहिल्यांदाचा ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’ची निर्मिती केली आहे. केवळ 10 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या टॅायलेटची दखल केंद्र आणि राज्य शासनाने घेतली आहे. दुहेरी उद्देशाने आणि अतिशय सुंदरपणे बांधलेल्या या टॉयलेटचे सर्वत्र कौतूक होत आहे.
advertisement
2/6
स्वच्छ आणि सुंदर शहर या संकल्पनेला अनुसरून राज्यात प्रथमच स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक अशा स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती नगर परिषदेद्वारा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नावीन्यपूर्ण योजनेतून यासाठी 10 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. हिंगणघाट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील निसर्गमय परिसरात अगदी 200 स्केअर फूट इतक्या कमी जागेत हे टॉयलेट स्थापित करण्यात आले आहे.
advertisement
3/6
यामध्ये एक कॅफे, पुरुष आणि महिलांकरिता प्रत्येकी 2 पाश्चात्य पद्धतीचे शौचालय, पुरुषांकरीता करिता 1 मुत्रीघर, वॉश बेसिन तसेच महिलांकरिता सेनीटरी वेंडींग मशीन या प्रकारच्या अत्याधूनिक सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. समोरील दर्शनीय भागात कॅफे देण्यात आलेला आहे. त्यामध्ये नागरिकांना स्वास्थवर्धक आणि आरोग्यदायी अंकुरित कडधान्य आणि ताज्या फळांचे ज्यूस उपलब्ध करून देण्यात येतील.
advertisement
4/6
या स्मार्ट कॅफेचे व्यवस्थापन हिंगणघाट शहरातील बचतगटाच्या महिलांना देण्यात आले असून या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
advertisement
5/6
नागरिकांना टॉयलेटच्या टेरेसवर उपलब्ध असलेल्या आसनावर बसून ज्यूस पिण्याचा आनंद घेता येणार आहे. या स्मार्ट कॅफे टॉयलेटची दखल केंद्र आणि राज्य शासनाने घेतली असून शासनाच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमातून या उपक्रमाला प्रसिध्दी देण्यात आली आहे. स्मार्ट कॅफे टॉयलेटच्या निर्मितीसाठी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, नगर अभियंता पटेल, कनिष्ठ अभियंता अली यांनी विशेष सहकार्य केले.
advertisement
6/6
कमी खर्चात अधिक उपयुक्त उपक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. हिंगणघाट नगरपरिषदेने अतिशय कमी खर्चात उत्तम असे दुहेरी उपयुक्त मॅाडेल तयार केले आहे. केंद्र आणि राज्य शासनाने देखील या टॉयलेटची दखल घेतली आहे. येत्या काळात जिल्ह्यात ठिकठिकाणी असे टॉयलेट उभे राहतील, यासाठी प्रयत्न करू. यासाठी अन्य नगरपरिषदांनी देखील पुढाकार घेणे आवश्यक आहे, असं वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ वर्धा/
राज्यात पहिल्यांदाच असं घडलं, हिंगणघाटाची बातमी वाचून कराल कौतुक
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल