इथं अंबर चरख्यावर होते सूतकताई, खादीचं कापड कसं बनतं पाहिलंत का?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
महात्मा गांधीजींच्या काळात पूर्णपणे हातावर चालणाऱ्या अंबर चरख्याला कालांतराने सौरऊर्जेची जोड दिली गेली.
advertisement
1/7

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या वास्तव्याने <a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">वर्धा जिल्ह्याला</a> एक विशेष ओळख निर्माण झाली आहे. तसेच महात्मा गांधींनी चरख्यावर सूत कताईला प्राथमिकता दिली. याबाबत आठवणी वर्ध्यातील मगन संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.
advertisement
2/7
मगन संग्रहालयात आजही ऑरगॅनिक कापसापासून मजबूत खादी कापड तयार केले जातेय. या ठिकाणी सूतकताई कशी केली जाते? खादी कापड कसे तयार केले जाते? याबद्दल देश विदेशातील पर्यटक संग्रहालयाला भेट देऊन जाणून घेतात.
advertisement
3/7
महात्मा गांधीजींच्या काळात पूर्णपणे हातावर चालणाऱ्या अंबर चरख्याला कालांतराने सौरऊर्जेची जोड दिली गेली. आता त्याला सोलर चरखादेखील म्हंटलं जातं. वर्धा शहरातील मगन संग्रहालय येथे असलेल्या सूतकताई विभागात गांधीजींच्या अंबर म्हणजेच आताच्या सोलर चरख्यावर काम होतंय. या विभागात सूतकताई ते खादी कापड तयार होण्यापर्यंतची नेमकी काय प्रक्रिया असते याबद्दल कताई विभागातील विभाताई रोटकर यांनी माहिती दिली आहे.
advertisement
4/7
सर्वात आधी ऑरगॅनिक कापूस खरेदी केला जातो. हिंगणघाट तालुक्यातील शेतकऱ्याकडून जास्त कापूस खरेदी होतो. जिनिंग मशीनमध्ये टाकून 67 टक्के सरकी तर 33 टक्के कापूस असा विभाजन केले जाते. त्या कापसापासून पुनी म्हणजेच रोविंग तयार केली जाते. ही सर्व प्रक्रिया रोविंग मशीनने केली जाते.
advertisement
5/7
आधी हाताने ही प्रक्रिया होत होती आता गेल्या 5-6 वर्षांपासून मगन संग्रहालय समितीकडून पुनी प्लांट गिरड येथे लावण्यात आला असून या प्लांटमधून हे रोविंग वर्धा मगन संग्रहालय सूतकताई विभागात आणल्या जाते, असं विभाताई रोटकर सांगतात.
advertisement
6/7
त्यानंतर या रोविंगपासून सूत कताई केली जाते, कताई 30 अंकापासून 100 अंकांपर्यंत केली जाते. याठिकाणी अंक म्हणजेच धाग्याची कॅलिटी असते. धागा तयार झाल्यानंतर हँग्स तयार केले जातात. त्यानंतर रंगाई विभागात प्रक्रिया केली जाते. इथेही मशीनच्या माध्यमातून ही प्रक्रिया होते.
advertisement
7/7
धाग्याला विणाईसाठी मजबुतीकरण करून तयार केले जाते. त्यापासून कोन तयार केले जातात. त्यानंतर वारपीन मशीन वर ताना तयार केला जातो. त्यानंतर आडवे आणि उभे ताने बाणे लावल्यानंतर हातमागावर कापड तयार होते ,असंही विभताई रोटकर यांनी सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ वर्धा/
इथं अंबर चरख्यावर होते सूतकताई, खादीचं कापड कसं बनतं पाहिलंत का?