TRENDING:

Weather Update: महाराष्ट्रात IMD ने शीत लहरीचा इशारा दिला, थंडीचा जोर वाढणार?

Last Updated:
IMD नुसार महाराष्ट्रात २१-२५ डिसेंबर दरम्यान थंडीचा संमिश्र परिणाम, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये कोल्ड वेव अलर्ट, नाशिक, धुळे, जळगावमध्ये यलो अलर्ट जारी.
advertisement
1/6
नव्या वर्षाआधी कडाक्याच्या थंडीची लाट, 2 जिल्ह्यांना सर्वाधिक धोका, IMDचा अलर्ट
उत्तर भारतात सध्या दाट धुके आणि 'रेड अलर्ट'ची स्थिती असताना, महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे राज्यात आणखी थंडी वाढणार की ओसरणार. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, २१ ते २५ डिसेंबर या काळात महाराष्ट्रात थंडीचा संमिश्र परिणाम पाहायला मिळणार आहे. काही भागांत 'शीत लहरी'चा इशारा देण्यात आला आहे, तर उर्वरित राज्यात हवामान स्थिर राहण्याची शक्यता आहे.
advertisement
2/6
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २१ आणि २२ डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये कोल्ड वेव अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या काही भागांत रात्री आणि पहाटेच्या किमान तापमानात घट होऊन कडाक्याचा गारवा जाणवू शकतो.
advertisement
3/6
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांच्या मते, आगामी ७ दिवसांत तापमानात फार मोठी मोठी चढ-उतार होणार नाही. राज्याच्या बहुतांश भागांत तापमान स्थिर राहील. उत्तर भारतात ज्याप्रमाणे २ ते ३ अंशांची वाढ किंवा घट होणार आहे, तसा तीव्र बदल महाराष्ट्रात सध्या दिसणार नाही.
advertisement
4/6
२५ डिसेंबरनंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव किमान तापमानात काही अंशी घट होऊन थंडीचा जोर वाढू शकतो. या जिल्ह्यांसाठी थंड़ीच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. केरळ आणि कर्नाटकातील काही भागांमध्ये दवबिंदू गोठायला लागले आहेत इतकी थंडी वाढली आहे.
advertisement
5/6
गल्फ ऑफ मन्नार आणि लगतच्या भागात Cyclonic Circulation मुळे समुद्रात काही ठिकाणी ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून दक्षिण महाराष्ट्रातील किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग थोडा जास्त असू शकतो.
advertisement
6/6
मध्य महाराष्ट्र २१ आणि २२ तारखेला थंडीचा कडाका जास्त असल्याने लहान मुले आणि वृद्धांनी पहाटे घराबाहेर पडणे टाळावे. जर तुम्ही उत्तरेकडे प्रवासाचे नियोजन करत असाल, तर तिथे दाट धुक्यामुळे विमान आणि रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. प्रवासापूर्वी वेळापत्रक नक्की तपासा. थंडीमुळे श्वसनाचे त्रास उद्भवू शकतात, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि कोमट पाण्याचा वापर करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Weather Update: महाराष्ट्रात IMD ने शीत लहरीचा इशारा दिला, थंडीचा जोर वाढणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल