TRENDING:

इतिहास आणि संस्कृतीचा सुरेख संगम! पावसाळ्यात पाहा मुंबईतील 'या' लेण्यांचं सौंदर्य

Last Updated:
लेणी म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर येतात एलिफंटा आणि कान्हेरी लेणी. परंतु याव्यतिरिक्तही इतर आकर्षक लेणी मुंबईत आहेत. स्थापत्य, शिल्पकलेचा हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या या विविध लेण्यांना आपण भेट देऊ शकता. पावसाळ्यात तर या लेण्यांना भेट देण्याचा आनंदच निराळा आहे. विकेंड साधून वन डे पिकनिक म्हणून आपण याठिकाणी जाऊ शकता. (प्रियंका जगताप, प्रतिनिधी / मुंबई)
advertisement
1/5
इतिहास आणि संस्कृतीचा सुरेख संगम! पावसाळ्यात पाहा मुंबईतील या लेण्यांचं सौंदर्य
महाकाली लेणी: ही लेणी कोंडीवती नावानं ओळखली जाते. मुंबईतील आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ती वसली आहे. मोठी गुहा असलेल्या या टेकडीच्या पायथ्याशी महाकाली मातेचं मंदिर आहे. त्यावरून या लेणीला 'महाकाली लेणी' असं नाव पडलं. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही लेणी प्रवेशासाठी सुरू असते.
advertisement
2/5
जोगेश्वरी लेणी : ही लेणी बौद्ध आणि वैदिक धर्म लेण्यांचा सुरेख संगम आहे. इथं बौद्ध आणि वैदिक लेणी मंदिर शिल्पांचं दर्शन होतं. या लेणीतील शिल्पांमध्ये लकुलीश, कल्याण सुंदर मूर्ती, नटराज, रावणाला अनुग्रह देणारा शिव, सारीपाठ खेळणारे शिवपार्वती, आयुष पुरुष आणि द्वारपाल यांच्या सुंदर प्रतिमा आहेत. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही लेणी प्रवेशासाठी सुरू असते.
advertisement
3/5
मंडपेश्वर लेणी : मुंबईतील अनेक लेण्यांपैकी सर्वात लहान लेणी म्हणजे बोरीवली दहिसरजवळील मंडपेश्वर लेणी. इथं आत मध्यभागी शिवमंदिर आणि त्याच्या दोन्ही बाजूस 2 लहान गुहा आतून जोडलेल्या आहेत. या गुहेत शिवतांडव, लकुलीश यांच्या प्रत्येकी 2 मूर्ती आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही लेणी प्रवेशासाठी सुरू असते.
advertisement
4/5
कान्हेरी लेणी : मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ही लेणी आहे. इथं बौद्ध काळातील कला संस्कृतीचं दर्शन घडतं. बौद्ध धर्म प्रसारकांचं हे मोठं ध्यान केंद्र असल्यानं प्रचंड मोठ्या संख्येनं लेणी घडवलेली आहे. काळ्याकुट्ट दगडापासून ही लेणी कोरलेली आहे. त्यामुळे इथली शिल्प अप्रतिम दिसतात. महायान कालखंडात खोदलेली ही शिल्प आहेत. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही लेणी प्रवेशासाठी सुरू असते.
advertisement
5/5
एलिफंटा लेणी : घारापुरी हे बेट एलिफंटा या नावानं ओळखलं जातं. मुंबईच्या जिजामाता उद्यानात असलेल्या या लेणी परिसरात हत्तीची शिल्प असल्यानं या बेटाला एलिफंटा लेणी म्हणतात. या बेटावर एकूण 7 लेण्या असून त्यात 5 शैव लेणी आणि 2 बौद्ध लेणी आहेत. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही लेणी <a href="https://news18marathi.com/maharashtra/thane/advisory-for-tourists-for-locations-near-mumbai-mspd-mhij-1209142.html">प्रवेशासाठी सुरू</a> असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
इतिहास आणि संस्कृतीचा सुरेख संगम! पावसाळ्यात पाहा मुंबईतील 'या' लेण्यांचं सौंदर्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल