Dadar Phul Market: दसऱ्यानिमित्त बाजारात फुल खरेदी करण्यासाठी जाताय ? ही पाहा ग्राहकांची तोबा गर्दी; Photos
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Dadar Phul Market Photos: दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडूची फुले आणि तोरण खरेदी करण्यासाठी दादरच्या फुल बाजारामध्ये गिऱ्हाईकांची मोठी गर्दी आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून शेतकरी आपला लाखमोलाचा शेतातला माल विकण्यासाठी बाजारामध्ये एकच गर्दी करताना दिसत आहे. दादरच्या फुल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर फुलांची आवक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
advertisement
1/5

दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडूची फुले आणि तोरण खरेदी करण्यासाठी दादरच्या फुल बाजारामध्ये गिऱ्हाईकांची मोठी गर्दी आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून शेतकरी आपला लाखमोलाचा शेतातला माल विकण्यासाठी बाजारामध्ये एकच गर्दी करताना दिसत आहे. दादरच्या फुल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर फुलांची आवक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
advertisement
2/5
गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे ऐन नवरात्रोत्सवामध्ये शेतकर्‍यांकडून होणारी झेंडूच्या फुलांची आवक घटली आहे. त्यामुळे झेंडूच्या फुलांचा भाव वधारल्याचं पाहायला मिळत आहे. एका ठिकाणी शेतकरी काही पिकांमुळे नाराज असताना फुलांच्या बाजारामध्ये शेतकऱ्याला दमदार भाव मिळताना दिसत आहे.
advertisement
3/5
उद्यावर दसरा सण ठेपला असताना व्यापारांसह ग्राहकांची बाजारामध्ये एकच गर्दी पाहायला मिळत आहे. झेंडू, शेवंती, गुलछडी आणि अष्टर या फुलांना बाजारामध्ये सर्वाधिक मागणी आहे. दादरच्या फुल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. कोणताही सण असो, त्याच्या आदल्या दिवशी मुंबई आणि उपनगरांमधून नोकरदार वर्ग ऑफिसवरून घरी परतत असताना बाजारातून फुलं खरेदी करत असतात.
advertisement
4/5
पावसाच्या पाण्याने भिजलेल्या फुलांना बाजारामध्ये फार कमी भाव मिळत आहे. तर, कोरड्या फुलांनाही चांगलाच भाव मिळत आहे. 100 रूपयांपेक्षा अधिक भाव त्या फुलांचा आहे. हार आणि तोरणच्या वेगवेगळ्या डिझायनिंग हाराने सर्वच ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. युनिक डिझाईन असलेल्या हारांनी किंमतीतही उच्चांक गाठला आहे. सुट्टे फुलं घेण्याऐवजी ग्राहक रेडिमेड असलेल्या हारांना सर्वाधिक पसंदी देत आहेत.
advertisement
5/5
अवघ्या काही तासांवरच दसरा सण येऊन ठेपला असून बाजारामध्ये ग्राहकांची एकच गर्दी पाहायला मिळत आहे. कालपासूनच मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांची आणि गिर्‍हाईकांची बाजारामध्ये ये- जा सुरू आहे. केव्हाही न झोपणाऱ्या मुंबईमधील हे दादर फुल बाजार रात्रभर सुरू आहे. अवकाळी पावसाचा झेंडूच्या फुलाच्या क्वालिटीवर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. अनेक घरगुती ग्राहक फुलांची खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये येत आहेत. ग्राहकांसोबतच किरकोळ व्यापारांचीही बाजारामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Dadar Phul Market: दसऱ्यानिमित्त बाजारात फुल खरेदी करण्यासाठी जाताय ? ही पाहा ग्राहकांची तोबा गर्दी; Photos