Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, पहिला हप्ता आला, तुमच्या खात्यात आले का 3000 रुपये? असं चेक करा
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा पहिला हप्ता महिलांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती.
advertisement
1/5

महायुती सरकारने रक्षाबंधन सणाच्या आधीच लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
advertisement
2/5
महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अंमलात आणली आहे.
advertisement
3/5
1 जुलैपासून ही योजना कार्यान्वित झाली असून आतापर्यंक 1 कोटी 35 लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तर, रक्षाबंधाच्या पार्श्वभूमीवर 17 ऑगस्ट रोजी हा निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.
advertisement
4/5
परंतु, त्या आधीच पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत असल्याचे समोर आले आहे. रक्षाबंधच्या पूर्वीच आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येलाच वर्धा जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे महिलांमधून समाधान व्यक्त होत आहे.
advertisement
5/5
ठाण्यातही काही महिलांचे खात्यावर 2 महिन्यांचे मिळून 3 हजार जमा झाल्याचे संदेश आले आहेत. सरकारने मुदतीपूर्वीच पैसे खात्यात वर्ग केल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तुम्ही तुमच्या बँक खात्याची शिल्लक तपासून याची खातरजमा करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, पहिला हप्ता आला, तुमच्या खात्यात आले का 3000 रुपये? असं चेक करा