Weather Alert: महाराष्ट्रात हाडं गोठवणाऱ्या थंडीची लाट, रविवारी ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: राज्यात पुन्हा हाडं गोठवणाऱ्या थंडीची लाट निर्माण झाली आहे. रविवारी हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
1/5

मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. कधी थंडीचा प्रभाव कमी होत आहे, तर काही वेळा अचानक गारवा वाढत असल्याचे चित्र आहे. रविवारी, 21 डिसेंबर रोजी पुणे-मुंबईसह राज्यातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज मुख्यतः कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि रात्री किंचित गारवा जाणवेल, मात्र दिवसा उष्णतेचा प्रभाव वाढलेला दिसेल. किमान तापमान सुमारे 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण पट्ट्यातही साधारण अशीच हवामान स्थिती राहणार असून थंडीचा विशेष प्रभाव जाणवणार नाही.
advertisement
3/5
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र थंडीचा कडाका काहीसा कमी होण्याची चिन्हे आहेत. सध्या पुण्यात किमान तापमान सुमारे 9 अंश सेल्सिअस आहे, मात्र पुढील काही दिवसांत त्यात वाढ होण्याची शक्यता असून आठवड्याच्या मध्यापर्यंत किमान तापमान 13 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे सकाळची थंडी कमी होत, हळूहळू सौम्य वातावरण निर्माण होईल.
advertisement
4/5
उत्तर महाराष्ट्रात मात्र थंडी पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांसाठी कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकमध्ये किमान तापमान सुमारे 7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता असून जळगावमध्ये हा पारा 6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागात पहाटे आणि रात्री कडाक्याची थंडी जाणवू शकते.
advertisement
5/5
मराठवाड्यात सध्या थंडी कायम राहणार आहे. रविवारी गारवा जाणवत राहील, मात्र मंगळवार आणि बुधवारपासून किमान तापमानात सुमारे 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गारठ्याची तीव्रता काहीशी कमी होईल. नांदेडसह इतर मराठवाड्यातील जिल्ह्यांतही साधारण अशीच हवामान स्थिती राहण्याचा अंदाज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: महाराष्ट्रात हाडं गोठवणाऱ्या थंडीची लाट, रविवारी ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट