Independence Day 2025 : BMC आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आकर्षक रोषणाई, PHOTOS
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐतिहासिक वास्तू तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाल्याचे पाहायला मिळत आहेत.
advertisement
1/7

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. येत्या 15 ऑगस्ट 2025 रोजी आपण देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत.
advertisement
2/7
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐतिहासिक वास्तू तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाल्याचे पाहायला मिळत आहेत. मुंबईतील नागरिक त्यासोबत सेल्फी घेत फोटो काढत आहेत.
advertisement
3/7
या रोषणाईमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारत अधिकच आकर्षक दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रचना ही लंडनमधील सेंट पॅंक्रास रेल्वे स्थानकाशी मिळती जुळती आहे.
advertisement
4/7
मुंबईच्या वैभवात भर घालणाऱ्या या दोन्ही वास्तू स्वातंत्र्य दिनानिमित्त हजारो दिव्यांनी उजळून गेल्या आहेत. त्यामुळे तिरंगी रोषणाई पाहण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे.
advertisement
5/7
तसेच या नयनरम्य दृश्याला दरवर्षी काहीजण डोळ्यात तर, काहीजण आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात.
advertisement
6/7
मुंबई महापालिकेचे मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला अनेक महत्त्वाच्या दिनानिमित्ताने त्याला साजेशी अशी रोषणाई करण्यात येते.
advertisement
7/7
त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या इमारतीला तिरंगी रोषणाई करण्यात आली. ( फोटो सौजन्य : गणेश काळे)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Independence Day 2025 : BMC आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आकर्षक रोषणाई, PHOTOS