TRENDING:

Mumbai Rain: तुफान आलंया! कोकणात जोरदार पाऊस, 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Last Updated:
या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदी-ओढ्यांच्या काठावर जाण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
1/5
तुफान आलंया! कोकणात जोरदार पाऊस, 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट
आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी कोकण किनारपट्टीवर पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून त्याचा परिणाम आजही दिसून येतो आहे. विशेष म्हणजे आज सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या तिन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदी-ओढ्यांच्या काठावर जाण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
2/5
तुफान आलंया! कोकणात जोरदार पाऊस, 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट
गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. सलग ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर आज पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत, तर काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. स्थानिक रेल्वेसेवेत देखील उशिराचा फटका बसतो आहे. दिवसभर हलका ते मध्यम आणि काही वेळा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबई या भागांमध्ये देखील पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे रहदारी विस्कळीत झाली आहे. दिवसभर अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी येण्याचा अंदाज वर्तवला आहे.
advertisement
4/5
मुंबई ठाण्यासह पालघर जिल्ह्यात आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मध्यम ते मुसळधार पावसाचा जोर कायम असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, खालच्या भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवनावर परिणाम होत आहे.
advertisement
5/5
रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग आज या तिन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. मुसळधार पावसाचा जोर कायम असून नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. रत्नागिरीत समुद्र खवळलेला, सिंधुदुर्गात वाऱ्याचा वेग वाढलेला आणि रायगडात पाणी साचण्याची आणि भूस्खलनाची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Rain: तुफान आलंया! कोकणात जोरदार पाऊस, 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल