TRENDING:

Mumbai Weather: कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार, मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार का? पाहा हवामानाचा अंदाज

Last Updated:
Mumbai Weather: कोकण किनारपट्टीसह मुंबई उपनगरात मागील काही दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाचा अनुभव येत आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
1/5
कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार, मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार का?
कोकण किनारपट्टीसह मुंबई उपनगरात मागील काही दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाचा अनुभव येत आहे. काल काहीसा विश्रांतीचा दिवस असला तरी आज पुन्हा ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दमट हवामानामुळे उकाडा वाढलेला असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
2/5
मुंबई शहरात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून सकाळपासूनच हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांमध्ये संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दमट हवामानामुळे उकाडा अधिक जाणवणार आहे.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबईत कालच्या तुलनेत आज पावसाचे प्रमाण काहीसे वाढण्याची शक्यता आहे. सकाळी वातावरण उबदार असून दुपारनंतर रिमझिम ते मध्यम स्वरूपाच्या सरी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस असेल.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज आहे. काही भागांत सकाळीच पावसाची हजेरी लागली आहे. समुद्र किनाऱ्यालगत वाऱ्याचा जोर जाणवण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वातावरण उष्ण आणि दमट असणार असून, तापमानाचा पारा 29 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
कोकणातील जिल्ह्यांमध्ये आज पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड, आणि सिंधुदुर्ग या भागांत दिवसभर रिमझिम ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असून, काही भागांमध्ये विजांसह जोरदार सरींचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. किमान तापमान 24 अंश सेल्सिअ तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअच्या आसपास राहील. या भागांमध्ये सखल भागांत पाणी साचू शकते, तसेच दरडी कोसळण्याचा धोका असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Weather: कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार, मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार का? पाहा हवामानाचा अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल