TRENDING:

India meet : उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी, इंडिया आघाडीच्या बैठकीचे PHOTOS समोर

Last Updated:
इंडिया आघाडीची मुंबईत दोन दिवसीय बैठक होत आहे. देशभरातील 26 विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत ग्रँड हयात हॉटेलमध्ये आजची पहिली बैठक होत आहे.
advertisement
1/7
उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी, इंडिया आघाडीच्या बैठकीचे PHOTOS समोर
इंडिया आघाडीची मुंबईत दोन दिवसीय बैठक होत आहे. देशभरातील 26 विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत ग्रँड हयात हॉटेलमध्ये आजची पहिली बैठक पार पडली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत काही महत्त्वाच्या विषयांवर मंथन होणार असल्याची माहिती मिळत आहे.
advertisement
2/7
आधी पाटणा, त्यानंतर बंगळुरु आणि आता मुंबईत इंडिया आघाडीची तिसरी बैठक होतेय. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा होणार आहे. मुंबईतील पंचतारांकित ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक होतेय.
advertisement
3/7
केंद्र सरकार आणि भाजपविरोधात विरोधकांची फौज म्हणजे इंडिया आघाडी. देशभरातील 28 विरोधी पक्षाचे प्रमुख 63 नेते मुंबईत दाखल झालेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांचं मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आलं.
advertisement
4/7
मुंबई विमानतळाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात राहुल गांधी, सोनिया गांधी यांचं स्वागत केलं. सोनिया गांधी पहिल्यांदाच इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित आहेत.
advertisement
5/7
याशिवाय एम. के. स्टॅलिन, डी. राजा, सीताराम येचुरी, मेहबूबा मुफ्ती यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक नेते मुंबईत पोहोचलेत. बुधवारी मुंबईत दाखल झालेल्या लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव यांनी प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतलं. या बैठकीच्या निमित्ताने इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.
advertisement
6/7
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा या बैठकीला हजर आहेत.
advertisement
7/7
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी सुद्धा यावेळी उपस्थितीत होत्या. आजच्या या बैठकीमध्ये किमान समान कार्यक्रम आणि राष्ट्रीय अजेंड्यावरही इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल. तसंच इंडिया आघाडीकडून एकत्र निवडणूक प्रचार पद्धतीचं नियोजन करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
India meet : उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी, इंडिया आघाडीच्या बैठकीचे PHOTOS समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल