ना पाणी ना वीज, इथून दिसतो पाकिस्तान, राजस्थानच्या सीमेवरचं शेवटचं गाव, कसं दिसतं पाहा PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
- local18
Last Updated:
गजुओ की बस्ती हे जैसलमेरमधील भारत-पाकिस्तान सीमेवरील शेवटचं गाव असून, येथे फक्त 150 लोक राहतात. वीज, पाणी, रस्ते नसून महिलांना पाण्यासाठी किलोमीटर चालावं लागतं.
advertisement
1/7

Last Village of Rajasthan: एक असं गाव जिथं फक्त 150 लोकवस्ती आहे. तिथून पाकिस्तान अगदी सहज दिसतं. या गावात वीज किंवा पाणी नाही. इथे पाण्यासाठी वणवण करावी लागते.हे गाव भारतातलंच आहे. ते कुठे आहे आणि तिथे लोक कसं राहतात जाणून घेऊया.
advertisement
2/7
Last Village of Rajasthan: राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेच्या अगदी लगत वसलेलं ‘गजुओ की बस्ती’ हे गाव आजही विकासाच्या प्रवाहाबाहेरच आहे. एका बाजूला राज्यातील अनेक गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी आणि डिजिटल सुविधा पोहोचल्या असताना, दुसऱ्या बाजूला सीमाभागावर असलेलं हे गाव अजूनही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. या गावातून पाकिस्तान स्पष्टपणे दिसतो, इतकी ही वस्ती सीमेजवळ आहे.
advertisement
3/7
Last Village of Rajasthan: गजुओ की बस्तीमध्ये आजतागायत ना वीज पोहोचली आहे, ना पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय आहे. गावात एकही पक्का घर नाही.रेतीत उभारलेली ही वस्ती अनेक दशकांपासून तशीच आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावातील महिलांना दररोज अनेक किलोमीटर पायपीट करावी लागते. कडक उन्हाळा, थंड वारे आणि वाळवंटातील प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करत हे लोक जगत आहेत.
advertisement
4/7
Last Village of Rajasthan: हे गाव जैसलमेरहून तनोटकडे जाणाऱ्या महामार्गाच्या जवळ आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरील हे राजस्थानमधील शेवटचं गाव मानलं जातं. लोकसंख्या अवघी सुमारे 150 च्या आसपास आहे. सीमावर्ती भाग असल्यामुळे अनेक सरकारी योजना आणि सुविधा इथपर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत. आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज अशा कोणत्याही मूलभूत सेवांचा लाभ ग्रामस्थांना मिळत नाही.
advertisement
5/7
Last Village of Rajasthan: अलीकडेच या गावाचा एक ड्रोन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमधून गावाची विदारक अवस्था समोर आली आहे. वाळूवर उभारलेली घरे, कुठलाही रस्ता नाही, वीजखांब नाहीत आणि पाण्याचा एकही स्रोत दिसत नाही. या व्हिडिओनंतर पुन्हा एकदा सीमावर्ती गावांच्या विकासाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
advertisement
6/7
Last Village of Rajasthan: गावाची भौगोलिक रचना आणि वाळवंटातील सौंदर्य पाहण्यासाठी काही पर्यटक येथे येतात. मात्र या सौंदर्याच्या आड लपलेलं वास्तव अतिशय कठीण आहे. डोकं आणि तोंडावर घुंगट घेऊन पाणी आणण्यासाठी कित्येक किलोमीटर महिलांना चालावं लागतं. प्राथमिक सुविधांशिवाय जगणारी कुटुंबं आणि भविष्यासंदर्भात अनिश्चितता हे चित्र अजूनही बदललेलं नाही.
advertisement
7/7
Last Village of Rajasthan: गजुओ की बस्ती ही सीमावर्ती भागात असल्यामुळे येथे जाण्यापूर्वी स्थानिक प्रशासन किंवा सुरक्षा दलांची परवानगी आवश्यक लागते. जैसलमेर शहर रेल्वे आणि रस्ते मार्गाने देशातील प्रमुख शहरांशी जोडलेलं आहे. जैसलमेरहून पुढे या गावाकडे जाण्यासाठी स्थानिक मार्गांचा वापर करावा लागतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
ना पाणी ना वीज, इथून दिसतो पाकिस्तान, राजस्थानच्या सीमेवरचं शेवटचं गाव, कसं दिसतं पाहा PHOTO