Shocking! लग्नाआधी कपलने काढले रोमँटिक फोटो, नंतर दोघांचाही मृत्यू; नेमकं काय घडलं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Couple Died After Pre-wedding Photoshoot : कपलचा साखरपुडा झाला होता, लवकरच लग्नही होणार होतं. लग्नाला काही दिवस बाकी असताना त्यांनी प्री-वेडिंग फोटोशूट केलं. त्यानंतर त्यांना मृत्यूने गाठलं.
advertisement
1/5

आता लग्न म्हटलं ती त्याआधी प्री-वेडिंग फोटोशूट आलंच. असंच प्री-वेडिंग फोटोशूट करणारं कपल त्यांना मृत्यूने गाठलं आहे. प्री-वेडिंग फोटोशूट केल्यानंतर दोघांचाही मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील कोप्पलमधील ही धक्कादायक घटना आहे.
advertisement
2/5
26 वर्षांचा करिअप्पा मदिवाल हनुमानहट्टी आणि 19 वर्षांची कविता पावडेप्पा मदिवाल हे कपल, 5 महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला. 21 डिसेंबरला त्यांचं लग्न होतं. दोन्ही कुटुंबाची लग्नाची तयारी सुरू होती. कपलने प्री-वेडिंग फोटोशूट केलं.
advertisement
3/5
होस्पेटमधील मुनीराबाद येथील पंपवन येथील तलावावर ते गेले होते. तिथं त्यांचे फोटोशूट झालं होतं. त्यानंतर ते बाईकने घरी परतत होते.
advertisement
4/5
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करिअप्पा आणि कविता बाईकवरून गंगावती इथं घरी परतत होते. तेव्हा एका ट्रकने बाईकला धडक दिली.
advertisement
5/5
कविताचा जागीच मृत्यू झाला तर करिअप्पा गंभीर जखमी झाला आणि त्याला गंगावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Shocking! लग्नाआधी कपलने काढले रोमँटिक फोटो, नंतर दोघांचाही मृत्यू; नेमकं काय घडलं?