TRENDING:

खाद्यपदार्थ की सप्लिमेंट्स? तुमच्या शरीरासाठी काय महत्त्वाचं? तज्ज्ञांनी दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

Last Updated:
आपल्या रोजच्या आहारात काही वेळा आवश्यक पोषणतत्त्वं मिळत नाहीत. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक आहार (supplements) घेणे गरजेचे ठरते. यामध्ये...
advertisement
1/5
खाद्यपदार्थ की सप्लिमेंट्स? तुमच्या शरीरासाठी काय महत्त्वाचं? तज्ज्ञ सांगतात...
आपल्या दैनंदिन जीवनात आपण जे अन्न खातो, त्याला पोषक घटक (Nutrients) म्हणतात. पण जेव्हा शरीरातील काही पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी आपण गोळ्यांच्या किंवा सिरपच्या स्वरूपात काही घेतो, तेव्हा त्याला सप्लिमेंट (Supplement) म्हणतात.
advertisement
2/5
सोप्या भाषेत सांगायचं तर, संतुलित आहाराला पूरक म्हणून सप्लिमेंट्स काम करतात. जेव्हा एखाद्याला आहारातून पोषक घटक मिळत नाही, तेव्हा हे सप्लिमेंट्स उपयुक्त असतात. यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अमिमो ॲसीड आणि औषधी वनस्पती असतात.
advertisement
3/5
व्हिटॅमिन्स : शरीराच्या विविध कार्यांसाठी व्हिटॅमिन्सची मोठ्या प्रमाणात गरज असते. उदाहरणार्थ, तुम्ही व्हिटॅमिन सी (Vitamin C), व्हिटॅमिन डी (Vitamin D) आणि व्हिटॅमिन बी (Vitamin B) सप्लिमेंट म्हणून घेऊ शकता.
advertisement
4/5
मिनरल्स : ही अशी अजैविक द्रव्ये आहेत, जी हाडांच्या आरोग्यासाठी, रक्ताचे संतुलन राखण्यासाठी आणि ऊर्जा निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असतात. उदाहरणार्थ, तुम्ही कॅल्शियम (Calcium), लोह (Iron) आणि मॅग्नेशियम (Magnesium) सप्लिमेंट म्हणून घेऊ शकता.
advertisement
5/5
अमिनो ॲसिड्स : प्रोटीन बनवण्यासाठी आणि ऊतींची (Tissues) दुरुस्ती व वाढीसाठी ही खूप महत्त्वाची आहेत. अनेकदा डॉक्टर ट्रिप्टोफॅन (Tryptophan) आणि ग्लुटामाईन (Glutamine) यांसारख्या अमिनो ॲसिड्सची सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला देतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
खाद्यपदार्थ की सप्लिमेंट्स? तुमच्या शरीरासाठी काय महत्त्वाचं? तज्ज्ञांनी दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल