TRENDING:

Sangli Rain: कृष्णेकाठच्या गावांना दिलासा, कोयना धरणातील विसर्गात कपात

Last Updated:
Sangli Rain: कृष्णा आणि वारणा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मात्र, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज (21 ऑगस्ट) सकाळपासून पावसाचा जोर ओसरल्याने पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. बुधवारी (20 ऑगस्ट) रात्री उशिरापर्यंत कोयना धरमातून 95,300 क्युसेक इतका विसर्ग सुरू होता.
advertisement
1/7
Sangli Rain: कृष्णेकाठच्या गावांना दिलासा, कोयना धरणातील विसर्गात कपात
गेल्या 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात हलक्या पावसाची शक्यता आहे. कोयना आणि वारणा धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुढील 24 तासांत पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
2/7
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ सुरू होती. यामुळे सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या भागात धास्तीचं वातावरण निर्माण झालं होतं. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सतरा तासांमध्ये तब्बल दहा फुटांची वाढ झाली होती.
advertisement
3/7
दिवसभर झपाट्याने पाणी पातळी वाढत राहिल्याने काही नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात आलं होतं. मात्र, गुरुवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करून 82,100 क्यूसेक्स करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
advertisement
4/7
यासह चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील अतिवृष्टीची तीव्रता थोडी कमी झाल्याने वारणेत होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. आज (21 ऑगस्ट) सकाळी सहा वाजता पाण्याचा विसर्ग 15,369 क्यूसेक्सपर्यंत खाली आणण्यात आला. त्यामुळे वारणा नदी काठच्या गावांना देखील दिलासा मिळाला आहे.
advertisement
5/7
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली तर सांगलीतील आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी स्थिरावू शकते, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय, ठिकठिकाणचे पूल आणि बंधाऱ्यांवरील पाणीपातळी ओसरण्याची देखील शक्यता आहे. ताकारी, भिलवडी, वसगडे, आयर्विन, अंकली, मिरज, वसगडे, राजापूर याठिकाणची पाणी पातळी कमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
सातारा परिसरात मागील 24 तासांत 45 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. कोयना धरण परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू झाल्यानंतर पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे बारा फुटांपर्यंत उघडले गेले होते.
advertisement
7/7
सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये सध्या पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला असला तरी संकट पूर्णपणे टळलेलं नाही. पश्चिम महाराष्ट्रात येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढू शकतो, अशी शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
Sangli Rain: कृष्णेकाठच्या गावांना दिलासा, कोयना धरणातील विसर्गात कपात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल