TRENDING:

Bhide Bridge Pune: पुण्यात मुसळधार पाऊस, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, भिडे पूल पाण्याखाली

Last Updated:
मुसळधार पावसाचा फटका शहराबरोबरच घाटमाथा आणि धरण क्षेत्रालाही बसला आहे. जवळपास सर्व प्रमुख धरणं भरली असून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आला आहे.
advertisement
1/7
पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, भिडे पूल पाण्याखाली
पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाचा जोर सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सकाळपासूनच शहरातील मध्यवर्ती भाग, उपनगर आणि घाटमाथा परिसरात सतत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.
advertisement
2/7
मुसळधार पावसाचा फटका शहराबरोबरच घाटमाथा आणि धरण क्षेत्रालाही बसला आहे. जवळपास सर्व प्रमुख धरणं भरली असून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आला आहे.
advertisement
3/7
सध्या खडकवासला धरणातून तब्बल 29,084 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरण क्षेत्रातून पाणी सोडण्यात आल्याने मुठा नदी दुथडी भरून वाहत असून नदी पात्रालगतचे रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.
advertisement
4/7
या वाढत्या पाणीपातळीमुळे डेक्कन परिसरातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला असून तो सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
advertisement
5/7
पुणे महापालिका आणि पोलिस प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीकाठी किंवा धोकादायक भागात जाण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने पायवाट, रस्ते आणि पूल वापरताना खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
6/7
शहरातील कात्रज, सिंहगड रोड, डेक्कन, कोथरूड, वारजे, तसेच नगर रोड, हडपसर या भागांतही पावसाचा जोर कायम आहे. अनेक अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर झाली आहे. काही ठिकाणी वाहनं बंद पडल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
advertisement
7/7
पुण्यातील वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. पावसाचा जोर पाहता पुढील काही तास शहर आणि जिल्ह्यात आणखी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Bhide Bridge Pune: पुण्यात मुसळधार पाऊस, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, भिडे पूल पाण्याखाली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल