TRENDING:

Ajit Pawar: अजितदादांसोबत 'सावली' सारखे होते सोबत, आज जाधवांनी अखेरच्या क्षणीही साथ सोडली नाही! PHOTOS

Last Updated:
अजित पवार यांच्यासह मुंबई पीएसओ एचसी विदीप जाधव विमानात उपस्थित होते. विदीप जाधव हे मागील अनेक वर्षांपासून अजितदादांचे सुरक्षारक्षक म्हणून काम पाहत होते.
advertisement
1/6
अजितदादांसोबत 'सावली' सारखे होते सोबत, जाधवांनी अखेरच्या क्षणीही साथ सोडली नाही
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र हळहळला आहे. बारामतीमध्ये खासगी विमान क्रॅश झालं. या अपघातात अजित पवार यांच्यासोबत ५ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये अजित पवारांसोबत सावलीसारखे सोबत असलेले मुंबई पोलीस दलाचे पीएसओ एचसी विदीप जाधव हे शहीद झाले.
advertisement
2/6
अजित पवार यांच्यासह मुंबई पीएसओ एचसी विदीप जाधव विमानात उपस्थित होते. विदीप जाधव हे मागील अनेक वर्षांपासून अजितदादांचे सुरक्षारक्षक म्हणून काम पाहत होते. विधिमंडळ असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल तिथे विदीप जाधव हे कायम सोबत असायचे.
advertisement
3/6
विदीप दिलीप जाधव हे ठाण्यातील कळवा येथील विटावा गावातील श्री कृष्ण विहार इमारतीत राहायचे. जाधव या ठिकाणी जास्त राहत नव्हते. पण, येणे जाणे होते.
advertisement
4/6
२४ तास ड्युटी असल्यामुळे विदीप जाधव हे कळव्यातील घरी कमी याायचे. आज सकाळी ६.३० वाजता ते कामाला जाताना पाहिले होते. पण, असं घडेल असं कुणाला वाटत नव्हतं, असं शेजाऱ्यांचं म्हणणं आहे.
advertisement
5/6
विटावा इथं त्यांच्या घरी त्यांची पत्नी मुलं आणि आई राहते. अपघातात निधन झाल्याची माहिती मिळताच सगळे जण बारामतीकडे रवाना झाले आहे.
advertisement
6/6
अजितदादांसोबत सावलीसारखे सोबत असणारे जाधव हे शेवटच्या क्षणीही अजितदादांसोबतच होते. कर्तव्यनिष्ठा, निष्ठा आणि शांत स्वभाव असणारे विदिप दिलीप जाधव यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Ajit Pawar: अजितदादांसोबत 'सावली' सारखे होते सोबत, आज जाधवांनी अखेरच्या क्षणीही साथ सोडली नाही! PHOTOS
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल