TRENDING:

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; वाहतूक कोंडीची कटकट मिटणार, आजपासून नवे बदल लागू

Last Updated:
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सलग सुट्ट्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे.
advertisement
1/7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतुकीत मोठा बदल, आजपासून अंमलबजावणी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सलग सुट्ट्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे.
advertisement
2/7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतुकीत मोठा बदल, आजपासून अंमलबजावणी
शनिवार, रविवार आणि मंगळवारी गुढीपाडवा अशा सलग सुट्ट्यांमुळे मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. वाहनांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर मोठ्या वाहतूक कोंडीची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
3/7
वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांना सकाळी बंदी घालण्यात आली आहे. आजपासून एक्स्प्रेस वे वर अवजड वाहनांना बंदी असणार आहे.
advertisement
4/7
7 एप्रिल पासून ते 9 एप्रिल पर्यंत सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेत अवजड वाहनांच्या वाहतुकीला एक्स्प्रेस वे वर बंदी घालण्यात आली आहे.
advertisement
5/7
सलग सुट्ट्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, प्रशासनानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
advertisement
6/7
सलग सुट्ट्यांमुळे पुण्याकडे येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होते, त्यातच या मार्गावर अवजड वाहनांची देखील मोठी वाहतूक असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
7/7
आजपासून पुढील दोन दिवस पुणे -मुंबई एक्स्प्रेस वे वर अवजड वाहनांना सकाळच्या वेळी प्रवेश बंदी करण्यात आली आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता कमी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; वाहतूक कोंडीची कटकट मिटणार, आजपासून नवे बदल लागू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल