Weather Alert: राज्यात मंगळवारचा दिवस जोरदार पावसाचा, 12 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 10 जून रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल पाहुयात.
advertisement
1/7

राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/7
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 10 जून रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल पाहुयात.
advertisement
3/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहणार असून, दुपारनंतर 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तर कोकणातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. या तिन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर वगळता इतर कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागाने कोणताही अलर्ट दिलेला नाही. परंतु नाशिक आणि नाशिकचा घाट परिसर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो.
advertisement
6/7
मराठवाड्यामध्ये धाराशिव आणि बीड जिल्ह्याला हवामान विभागाने 10 जूनसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. तर उर्वरित छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
7/7
विदर्भामध्ये पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहणार असून, काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: राज्यात मंगळवारचा दिवस जोरदार पावसाचा, 12 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट