Vanraj Andekar : चौकातली लाइट घालवली, एकट्याला गाठलं; गोळीबारानंतर कोयत्यानं वार, पुणे हादरलं
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Vanraj Andekar : पुण्यातील नानापेठ इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं पण उपचारावेळी त्यांची प्राणज्योत मालवली.
advertisement
1/5

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी रात्री साडे आठ वाजता नाना पेठेत गोळीबार झाला. गोळीबारानंतर त्यांच्यावर कोयत्याने वारही करण्यात आले.
advertisement
2/5
घरगुती कार्यक्रमामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. त्याचवेळी हल्लेखोरांनी संधी साधून तीन ते चार जणांनी आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या.
advertisement
3/5
वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबारानंतर तातडीने केईएम रुग्णालयात हलवण्यात आलं. गोळीबारावेळी त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याची माहिती समोर आलीय.
advertisement
4/5
वनराज यांचे दाजी गणेश कोमकर यांनी गोळीबार केल्याची माहिती समजते. गणेश कोमकर याने याआधी शिवसेना शहप्रमुख रामभाऊ पारेख यांच्यावर एसिड हल्ला केला होता.
advertisement
5/5
वनराज आंदेकर पुणे महानगरपालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून विजयी झाला होता. त्याआधी वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर २००७ आणि २०१२ मध्ये दोनवेळा नगरसेविका होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Vanraj Andekar : चौकातली लाइट घालवली, एकट्याला गाठलं; गोळीबारानंतर कोयत्यानं वार, पुणे हादरलं