TRENDING:

Shivneri Killa : महाराजांचा आणखी एक गड धोक्यात? शिवनेरी किल्ल्याची तटबंदी तुटली, वेदनादायक PHOTOS

Last Updated:
Shivneri Killa : पुणे जिल्ह्यातील किल्ले शिवनेरीच्या गणेश दरवाजा जवळ खडक ढासळून तटबंदी तुटल्याची घटना घडली. (रायचंद शिंदे, प्रतिनिधी)
advertisement
1/5
महाराजांचा आणखी एक गड धोक्यात? शिवनेरी किल्ल्याची तटबंदी तुटली, वेदनादायक PHOTOS
गेल्या काही वर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनेक गड-किल्ले ढासळताना पाहायला मिळत आहे. आज त्यात आणखी एकाच भर पडली.
advertisement
2/5
उत्तर पुणे जिल्ह्यात मागील काही दिवस सतत भिजपाऊस पडत आहे. किल्ले शिवनेरीवर असलेल्या गणेश दरवाजाच्या वरील बाजूस असलेला 7 ते 8 फूट लांब व 5 ते 6 फूट रुंदीचा खडक ढासळून किल्याच्या भातखळा बाजूला असलेल्या तटबंदीवर आदळला.
advertisement
3/5
गणेश दरवाजाच्या लगत असलेली किल्ल्याची 8 ते 9 फूट लांबीची तटबंदी तुटली आहे. यामध्ये काही झाडे सुद्धा भुईसपाट झाली आहे.
advertisement
4/5
यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने 31 जुलै पर्यत पर्यटकांना शिवनेरी किल्ल्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी याबाबत एक आदेश काढला आहे.
advertisement
5/5
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्याची पडझड शिवप्रेमींकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Shivneri Killa : महाराजांचा आणखी एक गड धोक्यात? शिवनेरी किल्ल्याची तटबंदी तुटली, वेदनादायक PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल