TRENDING:

3 वर्षे मेहनत, 10 तास दररोज सराव, कविता यांचा बारटेंडिंगमध्ये जागतिक विक्रम

Last Updated:
कविता यांनी 2021 मध्ये 'ओव्हर द शोल्डर वन हॅन्ड टू बॉटल वन मिनिट्स 122 फिलिप्स' करून जागतिक विक्रम केला आहे. विशेष म्हणजे असा विक्रम करणाऱ्या कविता या पहिला महिला आहेत.
advertisement
1/6
3 वर्षे मेहनत, 10 तास दररोज सराव, कविता यांचा बारटेंडिंगमध्ये जागतिक विक्रम
क्षेत्र कुठलं ही असलं तरी तुमचे अथक परिश्रम हे तुम्हाला नक्कीच यशाच्या शिखरावर नेत असतात. पण त्यासाठी हवे ते तुमची कष्ट करण्याची जिद्द आणि चिकाटी. याच उत्तम उदाहरणं म्हणजे मुळच्या कर्नाटकच्या असलेल्या कविता मेधार या होय.
advertisement
2/6
गेली 8 वर्ष त्या पुण्यात बारटेंडिंग शिकत आहे. कविता यांनी 2021 मध्ये 'ओव्हर द शोल्डर वन हॅन्ड टू बॉटल वन मिनिट्स 122 फिलिप्स' करून जागतिक विक्रम केला आहे. विशेष म्हणजे असा विक्रम करणाऱ्या कविता या पहिला महिला आहेत.
advertisement
3/6
कविता यांचा बारटेंडिंग करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. साडी परिधान केलेली, एका हातात मुल आणि एका हाताने त्या काचेच्या बाटल्यांसोबत बारटेंडिंग करताना दिसत आहेत.
advertisement
4/6
कविता या मुळच्या कर्नाटकातील एका छोट्या खेड्यातील आहेत. सध्या त्या पुण्यातील पुणे स्टेशन परिसरात असलेल्या फ्लाईर मनिया बारटेंडिंग अकॅडेमीमध्ये प्रशिक्षक आहेत. 3 वर्षे मेहनत घेऊन त्यांनी जागतिक विक्रम केला आहे.
advertisement
5/6
"मी 18 वर्षाची असताना पुण्यात आले. मला बारटेंडिंग बदल मला माहिती नव्हतं. माझे मामा राज मेधार यांनी मला या फिल्ड बद्दल शिकवलं. मग माझी आवड तयार होत गेली. मी जवळ पास 8 वर्ष या क्षेत्रात काम केलं. एक दिवस मी गूगलवर सर्च केलं. तेव्हा लक्षात आलं की बारटेंडिंगमध्ये एकाही महिलेचा रेकॉर्ड नाही. कोरोना काळात 3 वर्ष प्रॅक्टिस केली आणि नंतर हा रेकॉर्ड तयार झाला," असं कविता सांगतात.
advertisement
6/6
"कर्नाटकमधील एका छोट्या खेड्यात आई-वडील शेती करतात. मी सुरुवात बारटेंडिंग शिकायला सुरुवात 18 व्या वर्षी केली. 8 वर्षे सतत सराव केला, तेव्हा हा विक्रम करू शकले. त्यासाठी 3 वर्षे रोज 8 ते 10 तास सराव करत होते. आता जागतिक विक्रम झाला आहे. विशेष म्हणजे असा विक्रम करणारी मी पहिलीच महिला असल्याचा अभिमान वाटतो. आता सर्व स्तरांतून कौतुक होत असल्यानं सेलिब्रेट फील होतंय. लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. मात्र, बारटेंडिंग या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे," असंही कविता सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
3 वर्षे मेहनत, 10 तास दररोज सराव, कविता यांचा बारटेंडिंगमध्ये जागतिक विक्रम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल