TRENDING:

बारामतीत पोहोचले अन् अश्रूंचा बांध फुटला, सुनेत्रा पवार, पार्थ आणि सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर, विमानतळावर सगळेच रडले PHOTOS

Last Updated:
पत्नी सुनेत्रा पवार, जय पवार आणि खासदार सुप्रिया सुळे दिल्लीहून बारामतीत दाखल झाले. विमानतळावर पोहोचल्यावर सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर झाले.
advertisement
1/10
बारामतीत पोहोचले अन् अश्रूंचा बांध फुटला, सुनेत्रा पवार, पार्थ आणि सुप्रिया सुळे
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. अजितदादांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्रावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. अजितदादांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर पत्नी सुनेत्रा पवार, जय पवार आणि खासदार सुप्रिया सुळे दिल्लीहून बारामतीत दाखल झाले. विमानतळावर पोहोचल्यावर सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर झाले.
advertisement
2/10
अजित पवार यांचं आज सकाळी बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात निधन झालं. निधनाची बातमी समजल्यानंतर बारामतीत कुटुंबीय आणि राजकीय नेते पोहोचले आहे. खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे दिल्लीत होते. सकाळीच दिल्लीतून बारामतीकडे रवाना झाले.
advertisement
3/10
सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार बारामती विमानतळावर दाखल झाले तेव्हा वातावरण भावुक झालं होतं.
advertisement
4/10
विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी शरद पवार यांचे जुणे सहकारी मित्र विठ्ठल शेठ मणियार उभे होते त्यांना पाहून सुळे आणि पवार यांना अश्रू अनावर झाले.
advertisement
5/10
विठ्ठल शेठ मणियार यांनी त्यांची गळाभेट घेत सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर झाले.
advertisement
6/10
विठ्ठल शेठ मणियार यांना सुप्रिया सुळे म्हणाल्या 'तुमचा लाडला होता' असं म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
advertisement
7/10
सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनाही अश्रू अनावर झाले. पवार कुटुंबांना पाहून यावेळी उपस्थितीत लोकांच्याही डोळ्यात पाणी आलं.
advertisement
8/10
दरम्यान यावेळेस विमानतळावर राणा जगजित सिंह पाटील नेण्यासाठी आले होते. यावेळी जयंत पाटील, दादा भुसे होते.
advertisement
9/10
विमानतळातून बाहेर पडल्यानंतर पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार बारामती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यावेळी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना पाहताच कार्यकर्त्यांनी 'अजितदादा अमर रहे'च्या घोषणा दिल्या.
advertisement
10/10
त्याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुंबईतून बारामतीत हेलिकॉप्टरने दाखल झाले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
बारामतीत पोहोचले अन् अश्रूंचा बांध फुटला, सुनेत्रा पवार, पार्थ आणि सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर, विमानतळावर सगळेच रडले PHOTOS
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल