TRENDING:

Mayday! Mayday!! Mayday!!! दुर्घटनेआधी अजित पवारांच्या विमानातील पायलट ओरडला होता, याचा अर्थ काय?

Last Updated:
Ajit Pawar Plane Crash Mayday Call : अजित पवार यांचा विमान अपघात होण्यापूर्वी एक शेवटचा कॉल आला होता. या कॉलमध्ये नेमकं काय म्हटलं होतं?
advertisement
1/5
Mayday! दुर्घटनेआधी अजित पवारांच्या विमानातील पायलट ओरडला होता, याचा अर्थ काय?
अजित पवार यांचं विमान बारामतीत पोहोचलं तेव्हा तिथं दाट धुकं होतं. धावपट्टी दिसत नव्हती. तरीही पायलटने पहिल्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर हे विमान पुन्हा आकाशात झेपावलं. आकाशात एक मोठी घिरटी घालून आणि धावपट्टीचा अंदाज घेऊन हे विमान पुन्हा लँडींग करायला आलं. दुसऱ्यांदा लँडींग करताना विमान यशस्वीपणे उतरेल असा अंदाज होता. मात्र तसं झालं नाही. विमान थेट धावपट्टी सोडून बाजूला गेलं, आणि पुढच्या 4 ते 5 सेकंदात विमानाचा मोठा स्फोट घडून अपघात झाला.
advertisement
2/5
अपघातापूर्वी पायलटने MAYDAY कॉल केला होता, अशी माहिती आहे. मेडे कॉल ह शब्द ऐकल्यानंतर अनेकांना असं वाटतं की, तो मे महिन्याशी संबंधित आहे. पण, वस्तुस्थिती वेगळी आहे. मेडे हा शब्द फ्लाईट पायलट किंवा जहाजाच्या कॅप्टनकडून आपत्कालीन परिस्थितीत वापरला जातो.
advertisement
3/5
हा शब्द मायदेझ (m'aidez) किंवा मायडर (m'aider) या फ्रेंच शब्दांची इंग्रजी आवृत्ती आहे. 'मला मदत करा' असा याचा अर्थ होतो. फ्लाईट पायलट किंवा जहाजाच्या कॅप्टनला एखाद्या गंभीर धोक्याची जाणीव होते आणि तो टाळण्याचा कोणताही दुसरा मार्ग नसतो तेव्हा ते मेडे कॉलचा वापर करतात.
advertisement
4/5
पायलट किंवा कॅप्टन विमानतळावर किंवा बंदरावर असलेल्या सेंटरला एक डिस्ट्रेस कॉल करतात. तिथून प्रतिसाद मिळताच तो तीन वेळा मेडे म्हणतो. हे ऐकून विमानतळावर किंवा बंदरावर उपस्थित अधिकारी सतर्क होतात आणि पायलट किंवा कॅप्टनने दिलेली माहिती लक्षपूर्वक ऐकतात.
advertisement
5/5
आपत्कालीन परिस्थितीची माहिती देण्यासाठी 1920 मध्ये मेडे या शब्दाचा वापर सुरू झाला. लंडनमधील क्रॉडॉन विमानतळावरील वरिष्ठ रेडिओ अधिकारी फ्रेडरिक स्टॅनले मॉकफोर्ड यांनी सर्वात अगोदर हा सिग्नल वापरला होता. आणीबाणीच्या वेळी पायलट वापरू शकतील असा शब्द सुचवण्याची जबाबदारी मॉकफोर्ड यांच्याकडे दिली होती. त्यांनी फ्रेंच शब्द 'm'aider' (इंग्रजीमध्ये मेडे) याची निवड केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Mayday! Mayday!! Mayday!!! दुर्घटनेआधी अजित पवारांच्या विमानातील पायलट ओरडला होता, याचा अर्थ काय?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल