TRENDING:

Weather update : उत्तरेत थंडीची लाट; या राज्यांत आज पुन्हा पाऊस, महाराष्ट्रात काय स्थिती?

Last Updated:
एकीकडे पर्वतीय प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. तर दुसरीकडे त्याचा परिणाम म्हणून मैदानी राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे.
advertisement
1/5
उत्तरेत थंडीची लाट; या राज्यांत आज पुन्हा पाऊस, महाराष्ट्रात काय स्थिती?
नवी दिल्ली, 23 डिसेंबर : एकीकडे पर्वतीय प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. तर दुसरीकडे त्याचा परिणाम म्हणून मैदानी राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस उत्तर आणि पुर्वेकडील राज्यांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
आयएमडीने वर्तवेलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस पंजाब आणि हरियाणा राज्यातील विविध भागात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील किमान तापमानात देखील मोठी घट होणार असल्याचा अंदाज आहे.
advertisement
3/5
पंजाब, हरियाणा प्रमाणेच उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपूरामध्ये देखील पुढील दोन दिवस कडाक्याची थंडी पडणार असून या काळात दाट धुके पडणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
advertisement
4/5
स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस गिलगिट, बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, लडाख, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये हलक्या ते मध्य स्वरुपाच्या बर्फवृष्टीचा अंदाज आहे. तर दुसरीकडे उत्तराखंड, अंदमान आणि निकोबार, तामिळनाडू, केरळ, व लक्षद्वीपमध्ये आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
5/5
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास राज्यात वातावरण कोरंड राहणार असून, येत्या काळात किमान तापमानात आणखी घट होऊन गारठा वाढण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather update : उत्तरेत थंडीची लाट; या राज्यांत आज पुन्हा पाऊस, महाराष्ट्रात काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल