TRENDING:

Weather update : या राज्यांमध्ये पुढील सात दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय स्थिती? जाणून घ्या एका क्लिकवर

Last Updated:
भारतीय हवामान विभागानं (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार आज काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी तापमानात घट होऊन थंडी वाढणार आहे.
advertisement
1/5
या राज्यांमध्ये पुढील 7 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय स्थिती?
नवी दिल्ली 20 डिसेंबर : भारतीय हवामान विभागानं (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी दक्षिण तामिळनाडूमध्ये अति मुसळधार पाऊस झाला आहे. आजही कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थूथुकुडी आणि तेनकासी या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
advertisement
2/5
भारतीय हवामान विभागाकडून पुढील सात दिवस तामिळनाडू राज्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुदुच्चेरी, कराईकल, केरळ, आदंमान आणि निकोबारमध्येही पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
3/5
दुसरीकडे आज अनेक राज्यांमध्ये तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. पंजाब आणि हरियाणा देखील गारठं असून, मंगळवारी पंजाबचं किमान तापमान 5 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं होतं. उत्तर भारतामध्ये देखील थंडीचा कडाका वाढला आहे.
advertisement
4/5
दिल्ली देखील गारठली असून, दिल्लीमध्ये 6 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. देशातील अनेक राजांमध्ये आज दाट धुके पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार आंध्रप्रदेश आणि उत्तर, दक्षिण किनारी प्रदेशांमध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/5
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास पुढील दोन दिवस तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. राज्यात हवामान कोरडं राहणार असून, अनेक ठिकाणी कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather update : या राज्यांमध्ये पुढील सात दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय स्थिती? जाणून घ्या एका क्लिकवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल