Pune Rain: छत्री सोबत ठेवा! पुण्यात पुढील 24 तास पावसाचे, पश्चिम महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांनाही यलो अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
आज दिनांक 8 जून रोजी राज्यातील काही भागांसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सोलापूर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान चाळीशीपार पोहचले आहे.
advertisement
2/7
आज दिनांक 8 जून रोजी राज्यातील काही भागांसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सोलापूर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
3/7
पुणे जिल्ह्यात मागील 24 तासात 29.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच पुणे शहरात 30 मिलीमीटर पाऊस आणि शिवाजीनगर परिसरात 15 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. पुढील 24 तासात कमाल तापमान 30 अंशावर राहिल. गडगडाटी वादळासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
4/7
कोल्हापुरातील कमाल तापमान 31 अंशांवर राहिले आहे. पुढील 24 तासात कोल्हापुरातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस इतके राहील. पुढील 24 तासात साधारणपणे ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/7
पुढील 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस राहिल. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 42.2 मिलीमीटर तसेच वाई मध्ये 40 मिलीमीटर पाऊस कोसळला. पुढील 24 तासात सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मागील 24 तासात सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 31.1 अंशवर राहिले. तसेच एक दोन वेळा हलका पाऊस बरसला.
advertisement
6/7
पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात आकाश ढगाळ राहून मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासात सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस इतके राहिल. आकाश ढगाळ होऊन वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
7/7
मध्य प्रदेश आणि परिसरावर समद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तसेच विदर्भापासून उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Rain: छत्री सोबत ठेवा! पुण्यात पुढील 24 तास पावसाचे, पश्चिम महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांनाही यलो अलर्ट