Weather Alert: ऐन दिवाळीत पाऊस झोडपणार, पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, या जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातून मान्सूनने माघार घेतली असली तरी ऐन दिवाळीत पुन्हा पावसाला पोषक हवामान झाले आहे. हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला आहे.
advertisement
1/7

मान्सूनने महाराष्ट्रासह देशाचा निरोप घेतला असला तरी, राज्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. आज 17 ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात गुरुवारी 31.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 33 अंशावर राहिल. कमाल तापमानात अंशत: वाढ होऊन विजांसह पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/7
मागील 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 32.2 अंश सेल्सिअस इतके राहीले. आज संपूर्ण साताऱ्यासह घाटमाथ्यावर विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमानात अंशतः वाढ होऊन पारा 33 अंशावर पोहोचेल.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात काल गुरुवारी 32.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच 0.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर विजांसह पावसाची शक्यता आहे. यावेळी कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस इतके राहिल.
advertisement
5/7
गुरुवारी सोलापूर जिल्ह्यात 34.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज सोलापूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. यावेळी कमाल तापमान 35 अंशावर राहील.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 32.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारी जिल्ह्यात विजांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. 12 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी पारा 32.4 अंशावर राहील.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रात दिवाळीच्या काळात ऑक्टोबर हिटचे चटके जाणवत असून ढगाळ हवामान आहे. तर काही ठिकाणी पाऊस होतोय. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती राहणार असून ऐन दिवाळीत पावसाचा जोर वाढणार आहे. सातारा आणि कोल्हापूर परिसरात शनिवारपासून पुढील काही दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: ऐन दिवाळीत पाऊस झोडपणार, पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, या जिल्ह्यांना अलर्ट