Weather Alert: विदर्भात पाऊस, पश्चिम महाराष्ट्रात वेगळीच स्थिती, पुणे ते कोल्हापूर आजचं हवामान अपडेट
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather alert: राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. आता ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच पश्चिम महाराष्ट्रात पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे.
advertisement
1/7

अरबी समुद्रातील 'शक्ती'तीव्र चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकत आहे. तर ओडिशातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र बिहारकडे जाण्याची शक्यता आहे. ओडिशातील कमी दाब क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने आज 5 ऑक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजांसह पावसाची शक्यता असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मात्र मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात शनिवारी पावसाची उघडीप राहिली. यावेळी 30.8 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहिले. आज पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
3/7
मागील 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 31.2 अंश सेल्सिअस इतके राहीले. यावेळी पावसाची उघडीप राहिली. आज संपूर्ण साताऱ्यासह सातारा घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी 0.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 29.7 अंशावर राहील. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 4 ऑक्टोबर रोजी सोलापूरमध्ये 32.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावससाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात पावसाची उघडीप राहिली. यावेळी कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस इतके राहिले. पुढील 24 तासात जिल्ह्यात अंशत: ढगाळ आकाशासह एक दोन वेळा गडगडाटाची शक्यता आहे.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची नोंद होईल. मुख्यतः तापमानात काही अंशी वाढ होण्याची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पावसाची उघडीप शेतीच्या कामांना आणि वाचलेल्या पिकांच्या काढणीला उपयोगी ठरत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: विदर्भात पाऊस, पश्चिम महाराष्ट्रात वेगळीच स्थिती, पुणे ते कोल्हापूर आजचं हवामान अपडेट