Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा काळे ढग, सोलापूर ते कोल्हापूर अवकाळी झोडपणार, 4 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी संकट घोंघावत आहे. आज पुणे वगळता सर्वच जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
1/7

गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने हैराण केले आहे. अति प्रमाणात झालेला मोसमी पाऊस आणि थांबायचं नाव न घेणारा अवकाळी पाऊस यामुळे खरीप वाया जाऊन आता रब्बीच्या पेरण्या देखील खोळंबून राहिल्या आहेत. अशातच सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभरात अवकाळी पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. आज 5 नोव्हेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील हवामान कसे असेल जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात मंगळवारी 30.4 कमाल आणि 20.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आज पुणे जिल्ह्यातील तापमानात अंशतः वाढ होऊन कमाल तापमान 31 अंशावर पोहोचेल. यावेळी ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात मंगळवारी हलका पाऊस झाला. यावेळी 30.2 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहिले. आज सातारा जिल्ह्यात ढगाळ हवामान, विजांच्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे. साताऱ्यात विजांसह पावसाची शक्‍यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. यावेळी कमाल आणि किमान तापमानात अंशत: वाढ होऊन किमान 21 आणि कमाल 31 अंश सेल्सिअसवर राहील.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी तुरळक पाऊस झाला. आज हलक्या पावसाची शक्यता आहे. मंगळवारपासून तीन दिवस विजांसह जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. आज तापमान 29 अंशांवर राहील.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी 33.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज विजांसह पावसाची शक्यता असल्याने येल अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावेळी पारा 33 अंशावर पोहचण्याचा अंदाज आहे.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 31.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शिराळा परिसरात अवकाळी पावसाने काढणीत आलेल्या भात पिकाचे तसेच तासगाव कवठेमंकाळ परिसरात शाळू पिकाचे नुकसान केले. आज जिल्ह्यात गडगडाटी वादळासह मध्यम पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
7/7
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस तळ कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा काळे ढग, सोलापूर ते कोल्हापूर अवकाळी झोडपणार, 4 जिल्ह्यांना अलर्ट