जरा जपून, पुढे धोका आहे! 3 राशींसाठी जून महिना प्रचंड अडचणींचा ठरण्याची शक्यता
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
जून महिन्यात 3 राशींच्या व्यक्तींनी अत्यंत सावध आणि सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असं आम्ही नाही तर ज्योतिषशास्त्र सांगतंय. कारण वेगवेगळ्या मार्गांनी या व्यक्तींच्या वाट्याला नुकसान येणार आहे. त्यामुळे आधीच काळजी घेणं फायद्याचं ठरेल. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
1/5

अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी सांगितलंय की, ज्योतिषशास्त्रात प्रत्येक महिन्याला विशेष महत्त्व आहे. परंतु जून महिना खरोखर खास ठरेल, कारण या 30 दिवसांच्या कालावधीत बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्याचं राशीपरिवर्तन होणार आहे. आपल्या कुंडलीत या ग्रहांची स्थिती अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे त्यांचा राशीबदल झाल्यानं आपल्या आयुष्यात उलथापालथ होणार हे नक्की.
advertisement
2/5
मिथुन : आपल्यासाठी जून महिना खतरनाक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जपून राहा. सर्वात जवळच्या व्यक्तीकडून धोका मिळण्याचीही शक्यता आहे. तुमची इवलीशी चूक तुमच्या प्रतिष्ठेवर बेतू शकते. नको त्या वादात पडाल. आर्थिक गणित बिघडेल. त्यामुळे या महिन्यात गुंतवणूकही करू नका.
advertisement
3/5
कन्या : आपल्यासाठी संपूर्ण जून महिना तणावाचा आहे. अडचणी हात धुवून मागे लागतील. आर्थिक व्यवहार करताना अत्यंत विचारपूर्वक निर्णय घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा.
advertisement
4/5
कुंभ : आपल्यासाठी जून महिना काही फार बरा नसेल. विशेषतः करियरमध्ये अडचणी येतील. <a href="https://news18marathi.com/photogallery/astrology/money-horoscope-today-23-may-2024-in-marathi-read-your-daily-rashi-bhavishya-in-marathi-gh-mhrp-1186470.html">आर्थिक</a> स्थितीही नकारात्मकच असेल. लव्ह <a href="https://news18marathi.com/religion/buddha-purnima-2024-date-do-this-5-things-daan-for-peace-pitru-blessings-gh-mhkk-1186229.html">लाइफ</a> तर प्रचंड बिघडेल.
advertisement
5/5
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
जरा जपून, पुढे धोका आहे! 3 राशींसाठी जून महिना प्रचंड अडचणींचा ठरण्याची शक्यता