TRENDING:

फेब्रुवारीत होणार 2 मोठ्या ग्रहांची युती, 3 राशींसाठी ठरू शकते नुकसानाची, काळजी घ्या!

Last Updated:
February 2025 Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह वेळोवेळी राशीप्रवेश करतात. त्यातून शुभ, अशुभ योग जुळून येतात. जर 2 ग्रह एकाच राशीत आले, तर त्या ग्रहांची युती झाली असं म्हणतात. फेब्रुवारी महिन्यात 2 मोठ्या ग्रहांची युती होणार आहे. त्यातून काही राशींच्या व्यक्तींचं नशीब अक्षरश: उजळून निघेल, परंतु 3 राशींच्या व्यक्तींनी मात्र काळजी घ्यायला हवी, असं ज्योतिषांनी सांगितलं आहे.  (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
1/5
फेब्रुवारीत होणार 2 ग्रहांची युती, 3 राशींसाठी ठरू शकते नुकसानाची, काळजी घ्या!
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 12 फेब्रुवारीला सूर्य आणि शनी ग्रहांची युती होणार आहे. सूर्याला म्हणतात ग्रहांचा राजा आणि शनीला म्हणतात न्यायदेवता. या दोन्ही ग्रहांचा भरभरून आशीर्वाद काही राशींच्या व्यक्तींना मिळणार आहे. परंतु 3 राशींच्या व्यक्तींसाठी मात्र 12 फेब्रुवारीपासूनचा काळ जरा खडतर असण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या आहेत, जाणून घेऊया.
advertisement
2/5
वृषभ : सूर्य-शनीची युती झाल्यानंतर या राशीच्या व्यक्तींना आर्थिक अडचणी सोसाव्या लागण्याची शक्यता आहे. अगदी कर्ज घ्यावं लागण्याचीही वेळ येऊ शकते. त्यामुळे पैशांचा वापर जपून करावा.
advertisement
3/5
सिंह : या राशीच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतंही काम करण्यापूर्वी त्याची व्यवस्थित योजना आखावी. आर्थिक चणचण भासू शकते, त्यामुळे खर्च विचारपूर्वक करावे.
advertisement
4/5
कुंभ : या काळात नवं काम सुरू न करणं फायद्याचं ठरेल, कारण त्यातून नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूकही विचारपूर्वक करावी लागेल. नाहीतर नुकसान होऊ शकतं. अपघात होण्याचाही योग आहे. त्यामुळे प्रवासात काळजी घ्यावी. देवघरमधील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
फेब्रुवारीत होणार 2 मोठ्या ग्रहांची युती, 3 राशींसाठी ठरू शकते नुकसानाची, काळजी घ्या!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल