तुळशी विवाहाच्या दिवशी करा सोपे उपाय, घरात राहिल लक्ष्मी, करेल धनवर्षाव!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Tulsi Vivah 2024: दिवाळीची खरी सांगता तुळशी विवाहानं होते. या दिवशी तुळशीचं लग्न भगवान विष्णूंचं रूप असलेल्या भगवान शालिग्राम यांच्याशी लावलं जातं. त्यामुळे साक्षात लक्ष्मी-नारायणाच्या विवाहाचा हा दिवस अत्यंत शुभ असतो, असं ज्योतिषी सांगतात. (ईषा, प्रतिनिधी / ऋषिकेश)
advertisement
1/6

तुळशी विवाहाच्या दिवशी नेमके काय उपाय करावे याबाबत ज्योतिषांनी सविस्तर माहिती दिलीये. घरातील, दाम्पत्य जिवनातील अडचणींवर त्यांनी अगदी सोपे उपाय सांगितले आहेत.
advertisement
2/6
दाम्पत्य जिवनात सतत अडचणी येत असतील, प्रेमसंबंधांमध्ये खटके उडत असतील. तर तुळशी विवाहाच्या दिवशी आपल्या जोडीदारासोबत मंगलाष्टक पठण करणं शुभ मानलं जातं. यामुळे नात्यात गोडवा येतो आणि संसार सुखाचा होतो, असं म्हणतात.
advertisement
3/6
घरात सारखे वाद होत असतील, अशांत वातावरण निर्माण होत असेल, तर तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि आर्थिक अडचणी हळूहळू दूर होऊ शकतात, असं ज्योतिषी सांगतात.
advertisement
4/6
भगवान शालिग्राम आणि तुळशीचं विधीवत लग्न लावल्यास घरात लवकरच पाळणा हलू शकतो, असंही ज्योतिषांनी सांगितलं. त्यामुळे बाळासाठी प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्यानं आवर्जून तुळशी विवाह सण साजरा करावा, असा सल्ला ज्योतिषांनी दिला आहे.
advertisement
5/6
उत्तराखंडच्या ऋषिकेश भागात असलेल्या प्रसिद्ध अखिलेश्वर महादेव मंदिराचे पुजारी शुभम तिवारी यांनी ही माहिती दिली आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला सोळा शृंगार अर्पण करावा. यामुळे देवी-देवतांचा भरपूर आशीर्वाद मिळतो आणि आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदते, असं ते म्हणाले. दरम्यान, 13 सप्टेंबरला तुळशी विवाह सण साजरा होईल.
advertisement
6/6
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
तुळशी विवाहाच्या दिवशी करा सोपे उपाय, घरात राहिल लक्ष्मी, करेल धनवर्षाव!