Dussehra 2025 : दसऱ्याला झेंडूचीच फुलं का वापरतात? हे कारण तुम्हाला माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे दसरा. या दिवशी घरांची सजावट झेंडूच्या फुलांनी केली जाते. तसेच घरातील गाड्या, यंत्रे, मशिनरी यांची पूजा करून त्यांनाही झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवलं जातं.
advertisement
1/5

दसरा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण मानला जातो. दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे दसरा. या दिवशी घरांची सजावट झेंडूच्या फुलांनी केली जाते. तसेच घरातील गाड्या, यंत्रे, मशिनरी यांची पूजा करून त्यांनाही झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवलं जातं. दसरा तसेच इतर हिंदू सणांमध्ये झेंडूच्या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का झेंडूच्या फुलांचा वापर का केला जातो? दसरा किंवा इतर हिंदू धर्मातील सणांमध्ये झेंडूचीच फुलं का वापरली जातात? काय आहे यामागील कारण पाहुयात.
advertisement
2/5
हिंदू धर्मात पिवळा, केशरी आणि सोनेरी हे रंग मंगल आणि पवित्र मानले जातात. झेंडूच्या फुलांचा तेजस्वी रंग आनंद, विजय आणि उत्साह यांचे प्रतीक आहे. त्यामुळेच झेंडूचं फूल धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या विशेष महत्वाच स्थान आहे.त्यामुळे हिंदू धर्मातील कोणत्याही सणांमध्ये झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो.
advertisement
3/5
विजयोत्सवाच्या दिवशी झेंडूचे फूल अर्पण करण्याचेही महत्त्व आहे. झेंडू हे सूर्याचे प्रतीकही मानले जाते. शास्त्रामध्ये उल्लेख आहे की, झेंडूचे फूल सौंदर्याचेही केंद्र आहे, हे फूल जेथे लावले जाते, तेथे नकारात्मक ऊर्जाही दूर होते असेही मानले जाते.
advertisement
4/5
प्राचीन ग्रंथात असलेल्या नोंदीनुसार हे फुल सुंदरता आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. याला संस्कृतमध्ये स्थूल पुष्प या नावाने ओळखतात. सत्याचे प्रतीक मानलं जातं तसेच पिवळा रंग देवाप्रती समर्पणाचे प्रतीक आहे. याच्या सुंगधाने नकारात्मक शक्ती दूर होऊन ताण कमी होण्यास मदत होते.
advertisement
5/5
झेंडूचे फूल भगवान विष्णूला अर्पण केल्यास देव सर्व समस्या आणि संकटे दूर करतात. झेंडू हे भगवान विष्णूंचे आवडते फूल आहे, म्हणून ते त्यांच्या पूजेमध्ये देखील वापरले जाते. या सर्व कारणांमुळे हिंदू धर्मातील सणांमध्ये झेंडूच्या फुलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Dussehra 2025 : दसऱ्याला झेंडूचीच फुलं का वापरतात? हे कारण तुम्हाला माहितीये का?