झोपेतून उठल्यावर कधीच 'या' गोष्टी पाहू नका, अख्खं आयुष्य होईल खराब!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आपला पूर्ण दिवस कसा असेल हे आपल्या दिवसाची सुरूवात कशी होतेय यावर अवलंबून असतं. सकाळ सुंदर झाली की पूर्ण दिवस सुंदर जातो. आपण कधीतरी कोणाकडून ऐकलं असेल की, आज सकाळी सकाळी कोणाचं तोंड बघितलं काय माहिती दिवस खराब झाला. म्हणजेच सकाळ वाईट झाली की, आपला दिवस बिघडतो. याबाबत ज्योतिषांनी सकाळी नेमक्या कोणत्या गोष्टी पाहू नये हे सविस्तरपणे सांगितलं आहे. (शुभम, प्रतिनिधी / उज्जैन)
advertisement
1/5

वास्तूशास्त्रानुसार, सकाळी झोपेतून उठल्यावर आपली किंवा इतर कोणाची सावली पाहू नये. कारण या सावलीचा परिणाम आपल्या पूर्ण दिवसावर होतो. आपला दिवस तणावात जातो.
advertisement
2/5
सकाळी बंद घड्याळ किंवा सुई-दोरा पाहू नये. या वस्तू अशुभ मानल्या जातात. म्हणूनच त्या पाहिल्यास संपूर्ण दिवस वाईट जाऊ शकतो.
advertisement
3/5
सकाळी झोपेतून उठल्यानंतर कधीच आरश्यात पाहू नये. त्यामुळे रात्रभराची नकारात्मक ऊर्जा आपल्याप्रती आकर्षित होते. दिवसभर ती विचारांमधून दिसून येते. शिवाय कोणत्याच कामात पूर्ण लक्ष लागत नाही.
advertisement
4/5
सकाळी उठल्यानंतर आपले तळहात पाहणं सर्वात <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/3-auspicious-yogas-on-amavsya-do-not-miss-the-chance-to-get-relief-from-dosha-l18w-mhij-1176824.html">शुभ</a> मानलं जातं. तसंच गायत्री मंत्राचा जप करावा. झोपेतून उठल्या उठल्या देवाचा <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/astrology-says-not-to-use-the-jewelry-of-a-dead-person-l18w-mhij-1176602.html">फोटो</a> पाहावा किंवा मोराचे डोळे, एखादं फूल पाहिल्यासही आपला दिवस चांगला जाऊ शकतो.
advertisement
5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
झोपेतून उठल्यावर कधीच 'या' गोष्टी पाहू नका, अख्खं आयुष्य होईल खराब!