महाराष्ट्रात लग्नात देवीचा गोंधळ का घालतात? पाहा कशी सुरू झाली परंपरा
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
महाराष्ट्रात लग्न कार्यात देवीचा व खंडोबाचा जागरण गोंधळ घालण्याची परंपरा आहे.
advertisement
1/7

लग्नकार्याच्या शुभप्रसंगी गोंधळ घालण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रात पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे. ज्या घरी लग्नकार्य असतं त्या घरी जागरण गोंधळ किंवा देवीचा आणि खंडोबाचा जागर हा केलाच जातो. महाराष्ट्रात लग्न कार्याच्या प्रसंगी आपापल्या सोयीनुसार दिवस ठरवून गोंधळ घातला जातो.
advertisement
2/7
काही ठिकाणी हळदीच्या दिवशी तर काही ठिकाणी सत्यनारायणाच्या दिवशी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. मात्र महाराष्ट्रात गोंधळाची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? आणि लग्नकार्याच्या प्रसंगी गोंधळ घालण्याचं नेमकं काय महत्त्व असतं? यासंदर्भात <a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">वर्धा</a> येथील गोंधळी राजीव कानडे यांच्याकडून माहिती जाणून घेऊया.
advertisement
3/7
पूर्वजांपासून लग्नकार्याच्या प्रसंगी गोंधळ घालण्याची परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे. आपले आराध्य दैवत तुळजापूरची जगदंबा भवानी हे प्रत्येकाचे प्रेरणास्थान आहे आणि लग्न कार्यानिमित्ताने आपल्याकडे भवानी मातेचा गोंधळ घातलाच जातो.कारण घरातील शुभ कार्यप्रसंगी आराध्य देवतेला आमंत्रित करणे आणि हिरव्या मांडवामध्ये भवानी मातेचा जागरण गोंधळ करणे महत्वाचं असतं, असे कानडे सांगतात.
advertisement
4/7
घरात लग्नकार्य असताना सर्व रीती कामे निर्विघ्नपणे पार पडवीत म्हणून देवीला घरच्या शुभकार्यात सहभागी होण्याचं आवाहन करायचं असतं. जागरण गोंधळ च्या माध्यमातून भवानी मातेला विनंती केली जाते. की आई जगदंबा भवानी आमच्या घरी गोंधळाला ये आणि तुझ्या भोळ्या भक्तावरचे संकट दूर कर, असे कानडे सांगतात.
advertisement
5/7
तसेच पूर्वीच्या काळामध्ये मोबाईल नव्हते, कोणते मनोरंजनाचे साधन नव्हती. ग्रामीण भागात एखाद्या घरी लग्न असलं की सर्व नातेवाईक जमा व्हायचे. मग मनोरंजनासाठी अंगणामध्ये देवीचा गोंधळ घातला जायचा. हिरव्या मांडवामध्ये एकीकडे हळद लावण्याचा कार्यक्रम चालायचा. त्याच्यामध्ये पाहुणेमंडळीची मनोरंजनही व्हायचं आणि सर्वांची रात्र हसत खेळण्यांमध्ये निघून जायची.
advertisement
6/7
जसं विदर्भामध्ये लग्नाच्या नंतर सत्यनारायण केला जातो. सत्यनारायणाची पूजा पाठ केली जाते. तर मराठवाड्यामध्ये वर वधू एका ठिकाणी आल्याच्या नंतर गोंधळाची पूजा मांडणी करून देवीचा गोंधळ घालून तेल जाळण्याची परंपरा आहे.
advertisement
7/7
विदर्भामध्ये हळदीच्या दिवशी वधू किंवा वराच्या हाताने त्यांच्या लग्नघरी तेल जाळले जाते. अशाप्रकारे ही देवीचा, खंडोबाचा गोंधळ घालण्याची परंपरा चालत आली आहे, अशी माहिती गोंधळी राजीव कानडे यांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
महाराष्ट्रात लग्नात देवीचा गोंधळ का घालतात? पाहा कशी सुरू झाली परंपरा