स्वप्नात जिवंत नाही, मेलेला साप दिसणं अत्यंत शुभ, नेमका काय असतो यामागे संकेत?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
झोपेत स्वप्न पडणं सामान्य आहे. परंतु काही स्वप्न धडकी भरवतात, तर काही स्वप्न विचारात पाडतात. काही स्वप्न शुभ संकेत घेऊन येतात, तर काही स्वप्न अशुभ संकेत देतात, असं स्वप्नशास्त्र सांगतं. स्वप्नात जर कधी साप दिसला तर भलेभले दचकून जागे होतात. तुम्हाला कधी स्वप्नात मेलेला साप दिसलाय का? (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
1/5

फार कमी लोक असे असतात ज्यांना सापाची भिती वाटत नाही. नाहीतर भलेभले सापाला घाबरतात. स्वप्नात मेलेला साप दिसण्यामागे नेमका काय अर्थ असतो याबाबत ज्योतिषी काय सांगतात जाणून घेऊया.
advertisement
2/5
देवघरमधील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, काही स्वप्न आपल्या विचारांतून पडतात. तर, काही स्वप्न आपल्याला भविष्याबाबत संकेत देतात.
advertisement
3/5
स्वप्नात विविध अवस्थेत साप दिसण्याचा भविष्यावर वेगवेगळा प्रभाव पडतो. जसं की, जर साप आपला पाठलाग करतोय असं स्वप्न पडलं तर भविष्यात आपल्याला एखाद्या अशुभ घटनेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे, असा याचा अर्थ होतो.
advertisement
4/5
जर स्वप्नात मृत साप दिसला तर भविष्यात नक्कीच काहीतरी लाभ होणार आहे असा अर्थ होतो. त्यामुळे स्वप्नात मेलेला साप पाहणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे आपल्या आयुष्यात राहू दोष किंवा पितृदोषामुळे काही अडचणी असतील तर त्यापासून लवकरच सुटका होऊ शकते आणि घरात सदैव सुख, समृद्धी नांदू शकते याचा हा संकेत असतो, असं ज्योतिषांनी सांगितलं.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
स्वप्नात जिवंत नाही, मेलेला साप दिसणं अत्यंत शुभ, नेमका काय असतो यामागे संकेत?