3 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ, आता लवकरच लागू शकते लॉटरी!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बुध ग्रह मीन राशीत विराजमान आहे. येत्या 7 एप्रिलला बुध ग्रह सरळमार्गी चालायला सुरुवात होईल. तसंच 8 एप्रिलला बुध ग्रहाचा उदय होणार आहे. त्यानंतर 7 मे रोजी बुध ग्रहाचा मेष राशीत प्रवेश होईल. या तीनही हालचालींचा 3 राशींच्या व्यक्तींवर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडणार आहे. त्यांच्यासाठी यातून अतिशय खास, प्रगतीचे दिवस सुरू होतील. त्यांचं नशीबच पालटेल, असं ज्योतिषांनी सांगितलं आहे. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
1/5

अयोध्येतील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे. ज्योतिषी सांगतात की, बुध ग्रहाला ज्ञान, व्यापार आणि संवादाचा कारक मानलं जातं. जेव्हा जेव्हा या ग्रहाचा आशीर्वाद मिळतो, तेव्हा व्यक्तीचं करियर प्रगतीपथावर येतं. आता कोणाला बुध ग्रहाचा आशीर्वाद मिळणार, जाणून घेऊया.
advertisement
2/5
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत शुभ असेल. कामकाजात लाभ होईल. रखडलेली कामं मार्गी लागतील. मेहनतीचं जबरदस्त फळ मिळेल. या काळात नवं काम सुरू करू शकाल. धार्मिक कार्यातही सहभागी व्हाल.
advertisement
3/5
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष फायद्याचा असेल. करियर, व्यवसायात प्रगती होईल. नवं काम सुरू करू शकाल. उत्पन्न कमालीचं वाढेल. आरोग्य उत्तम साथ देईल. जीवनशैली सुधारेल.
advertisement
4/5
धनू राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप खास असेल. इतरांकडे किंवा गुंतवणुकीत अडकलेले हक्काचे पैसे परत मिळतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. दाम्पत्य जीवनात सुख येईल. कामकाज विस्तारेल. गुंतवणुकीसाठीही अनुकूल काळ असेल.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
3 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ, आता लवकरच लागू शकते लॉटरी!