Akshaya Tritiya: गुरू-शुक्राचा अस्त! यंदा अक्षय्य तृतीयेला एकही विवाह मुहूर्त नाही
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
येत्या 10 मे रोजी सर्वत्र अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाईल. या दिवशी सोनं खरेदी करण्याची प्रथा आहेच, परंतु नवं काम सुरू केल्यास त्यातून भरपूर नफा मिळतो आणि आपल्या आयुष्याची भरभराट होते असं म्हणतात. शिवाय याच दिवशी अनेकजण लग्नबंधनात अडकतात. परंतु यंदा कोणालाही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्त लग्न करता येणार नाहीये, कारण या दिवशी लग्नासाठी एकही मुहूर्त नाही. याबाबत ज्योतिषी काय सांगतात जाणून घेऊया. (लखेश्वर यादव, प्रतिनिधी / जांजगीर चांपा)
advertisement
1/5

ज्योतिषी वसंत शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय्य तृतीया हा दिवस भगवान परशुराम यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. भगवान परशुराम यांना विष्णूंचा अवतार म्हणतात. म्हणूनच हा दिवस अत्यंत शुभ असतो.
advertisement
2/5
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेक शुभकार्य पार पडतात. परंतु यंदाच्या अक्षय्य तृतीयेला गुरू आणि शुक्र ग्रहाचा अस्त होणार असल्याने कोणतंही शुभकार्य होणार नाही. अगदी विहीर खोदणं, गृहप्रवेश करणं ही कार्यदेखील या दिवशी केली जाणार नाहीत.
advertisement
3/5
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, जरी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणतंही <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/astrology-do-not-do-these-things-on-akshaya-tritiya-even-by-mistake-l18w-mhij-1175469.html">शुभकार्य</a> होणार नसलं, तरी आपण दान आवर्जून करू शकता. त्यातून आपल्याला पुण्यच मिळेल.
advertisement
4/5
ज्योतिषांनी सांगितलं की, आता जेव्हा शुक्र ग्रहाचा पश्चिम दिशेत उदय होईल तेव्हाच शुभकार्य पार पडतील. म्हणजेच 7 जुलैनंतर लग्न <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/akshaya-tritiya-2024-do-not-miss-the-muhurat-of-buying-gold-jewelry-l18w-mhij-1175921.html">मुहूर्त</a> आहेत.
advertisement
5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Akshaya Tritiya: गुरू-शुक्राचा अस्त! यंदा अक्षय्य तृतीयेला एकही विवाह मुहूर्त नाही