TRENDING:

तुळशीचं लग्न म्हणजे सुखाची नांदी! संसार होऊ शकतो मनासारखा, हलू शकतो पाळणा, करा खास उपाय

Last Updated:
Tulsi Vivah 2024: सर्वत्र सकारात्मक, प्रसन्न वातावरण निर्माण करणाऱ्या दिवाळी सणाची सांगता खऱ्या अर्थानं तुळशी विवाहाला होते. तुळशीचं लग्न ही शुभकार्यांची नांदी मानली जाते. म्हणूनच अत्यंत शुभ दिवसांपैकी एक असल्यामुळे या दिवशी म्हणजेच तुळशी विवाहाच्या दिवशी सुखी आयुष्यासाठी काही खास उपाय करण्याचा सल्ला ज्योतिषी देतात. हे उपाय नेमके कोणते आहेत, पाहूया. (ईशा बिरोरिया, प्रतिनिधी / ऋषिकेश)
advertisement
1/7
संसार होऊ शकतो मनासारखा, हलू शकतो पाळणा, तुळशी विवाहाला करा खास उपाय
जर आपल्या दाम्पत्य जीवनात सतत अडचणी येत असतील, लहान लहान गोष्टींवरून खटके उडत असतील, प्रेमसंबंधांमध्ये वाद होत असतील, तर आपण तुळशी विवाहाच्या दिवशी आपल्या जोडीदारासोबत मंगलाष्टक पठण करणं शुभ ठरेल. यामुळे मनात सकारात्मकता निर्माण होईल आणि नात्यात गोडवा येईल, असं ज्योतिषांनी सांगितलं आहे.
advertisement
2/7
संपूर्ण घरात सदैव सुख-समृद्धी राहावी, घराची सर्वांगीण भरभराट व्हावी, यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी न विसरता तुळशीसमोर तुपाचाच दिवा लावण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतात, अशी मान्यता आहे.
advertisement
3/7
अखंड सौभाग्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी देवीचं भगवान शालिग्राम (भगवान विष्णूंचं रूप) यांच्याशी विधीवत लग्न लावावं. लग्नासाठी तुळशीला सोळा शृंगारांनी सजवावं. यामुळे देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदू लागते. तसंच घरात लवकरच पाळणा हलतो, असं ज्योतिषांनी सांगितलं आहे.
advertisement
4/7
उत्तराखंडमधील साक्षात देवतांची भूमी मानल्या जाणाऱ्या ऋषिकेश येथील प्रसिद्ध श्री सच्चा अखिलेश्वर महादेव मंदिराचे पुजारी शुभम तिवारी यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात तुळशी विवाह सण साजरा होतो.
advertisement
5/7
साक्षात भगवान विष्णू आणि तुळशीचं लग्न होतं. त्यामुळे या दिवशी केलेल्या काही खास उपायांमधून दाम्पत्य जीवनात सुख येतं आणि घर आनंदी राहतं. दरम्यान, तुळशी विवाहानंतर पौर्णिमेपर्यंतही अनेकजण तुळशी विवाह साजरा करतात.
advertisement
6/7
पंचांगानुसार, यंदा 11 नोव्हेंबरला, सोमवारी कार्तिक एकदशी तिथी संध्याकाळी 6 वाजून 42 मिनिटांपासून 12 नोव्हेंबरला, मंगळवारी 7 वाजून 24 मिनिटांपर्यंत असेल. उदयतिथीनुसार, 12 नोव्हेंबरला संध्याकाळी तुळशी विवाह सण साजरा केला जाईल.
advertisement
7/7
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
तुळशीचं लग्न म्हणजे सुखाची नांदी! संसार होऊ शकतो मनासारखा, हलू शकतो पाळणा, करा खास उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल